chala hawa yeu dya fame actress shreya bugade shared post for her mother father anniversary
श्रेया बुगडेच्या आईवडिलांना पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:53 PM1 / 7कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या श्रेयाला 'चला हवा येऊ द्या'मुळे प्रसिद्धी मिळाली. 2 / 7श्रेयाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच श्रेयाने तिच्याआईवडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 3 / 7श्रेयाच्या आईवडिलांच्या लग्नाचा आज ४३वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने श्रेयाने तिच्या आईवडिलांचे काही खास फोटो शेअर केले आहेत. 4 / 7श्रेया हुबेहुब तिच्या आईसारखी दिसते, हे फोटो पाहून लक्षात येईल. तिला एक मोठी बहिणही आहे. 5 / 7 हे फोटो शेअर करत श्रेयाने तिच्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 6 / 7'तुमच्या प्रेमाने मला निस्वार्थ आणि कमिटमेंटचं सौंदर्य पाहायला शिकवलं. तुमचं प्रेम नेहमीच प्रेरणा देत राहील', असं श्रेयाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 7 / 7श्रेयाने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications