चेहऱ्यावर 25-30 टाके, करावा लागला रिजेक्शनचा सामना; अभिनेत्रीने सांगितला वाईट अनुभव By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 5:58 PM1 / 10'एमटीव्ही रोडीज 7' फेम चार्ली चौहानने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या हृदयात आधीच एक खास स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री 'कैसी ये यारियां'सह इतर काही शोमध्ये दिसली आहे आणि ती तिच्या नृत्यासाठीही प्रसिद्ध आहे. 2 / 10चार्ली बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यावरुन गायब होती, मात्र आता ती पुनरागमन करत आहे. याच दरम्यान, चार्लीने तिच्या संघर्षमय दिवसांबद्दल मोकळेपणाने सांगितलं. चेहऱ्यावर झालेल्या दुखापतीमुळे तिला अनेक शोमधून रिप्लेस करण्यात आलं आहे. 3 / 10चार्लीच्या म्हणण्यानुसार, तिच्या चेहऱ्यावर दुखापत झाली होती. त्यामुळे 25-30 टाके पडले. तिला यातून बरं होण्यासाठी खूप वेळ लागला, पण यामुळे तिला अनेक मोठे शो देखील गमवावे लागले. 4 / 10चेहऱ्याच्या दुखापतीमुळे अनेक मालिकांमध्ये चार्लीला रिप्लेस करण्यात आलं. पण नंतर या खुणा हळूहळू कमी झाल्या. ई-टाइम्ससोबतच्या संवादात चार्ली यावर बोलली आहे. 'माझ्या गालावर 25-30 टाके पडले होते, जे वेळेत बरे झाले.'5 / 10'आज जेव्हा मी स्वतःला आरशात पाहते तेव्हा मला खूप भाग्यवान वाटतं. कारण, या खुणा कधीतरी जातील आणि मी या इंडस्ट्रीचा पुन्हा एकदा एक भाग बनू शकेन, असं मला कधीच वाटलं नव्हतं.'6 / 10'या खुणांमुळे मला एक-दोनदा नव्हे तर अनेक वेळा रिजेक्शनचा सामना करावा लागला. पण, वेळ सर्व जखमा भरून काढते असं म्हणतात. तशा या खुणा देखील नाहीशा झाल्या' असं चार्लीने म्हटलं आहे. 7 / 10चार्ली चौहान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. चार्लीने 'दिल दोस्ती डान्स' फेम को-स्टार कुंवर अमरला डेट केलं आहे. पण काही काळानंतर हे दोघेही वेगळे झाले आहेत. 8 / 10बिझी शेड्युलमुळे दोघांना एकमेकांना वेळ देता आला नाही, त्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव वाढू लागला. यानंतर दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. चार्ली सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 9 / 1010 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications