Join us

एसीपी प्रद्युमन ते दया! CID च्या कलाकारांचं एका दिवसाचं मानधन किती होतं माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 10:32 AM

1 / 9
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला शो म्हणजे सीआयडी (CID). जवळपास २० वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यामुळे आजही हा कार्यक्रम चर्चेत येतो. म्हणून, त्या काळी गाजलेल्या या मालिकेसाठी यातील कलाकारांनी किती मानधन घेतलं ते जाणून घेऊयात.
2 / 9
ACP प्रद्युमन - ACP प्रद्युमन ही भूमिका साकारुन लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शिवाजी साटम. या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.या भूमिकेसाठी त्यांना १ लाख रुपये मानधन देण्यात येत होतं.
3 / 9
अभिजीत- या कार्यक्रमात अभिनेता आदित्य श्रीवास्तव याने अभिजीत ही भूमिका साकारली होती. या मालिकेसाठी तो ८० हजार रुपये मानधन घेत होता. आदित्यने मालिकांसह गाजलेल्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
4 / 9
फ्रेडरिक्स - आपल्या विनोदी अभिनयशैलीने दिनेश फडणीस याने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. या मालिकेत त्याने फ्रेडरिक्स ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याने ७० ते ८० हजार रुपये मानधन घेतलं होतं.
5 / 9
डॉ. साळुंखे- या मालिकेतील डॉ. साळुंखे ही भूमिका अभिनेता नरेंद्र गुप्ता यांनी साकारली होती. या भूमिकेसाठी ते ४० हजार रुपये मानधन स्वीकारत होते.
6 / 9
डॉ. तारिका- डॉ. साळुंखे यांच्या असिस्टंटची भूमिका अभिनेत्री श्रद्धा मुसळे हिने साकारली होती. तारिकाच्या भूमिकेसाठी श्रद्धा ४० हजार रुपये मानधन घ्यायची.
7 / 9
विवेक - अभिनेता विवेक मशरु याने इंस्पेक्टर विवेकची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तो ४० हजार रुपये मानधन घ्यायचा.
8 / 9
इन्स्पेक्टर सचिन - अभिनेता ऋषिकेश पांडे याने या मालिकेच इन्स्पेक्टर सचिन ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यानेही ३० ते ४० हजारच्या आसपास मानधन घेतलं होतं.
9 / 9
दया- या मालिकेतील दया ही भूमिका विशेष गाजली. या मालिकेत अभिनेता दयानंद शेट्टी याने दयाची भूमिका साकारली होती. उत्तम पर्सनालिटी आणि फिटनेस यामुळे दया विशेष लोकप्रिय झाला. या भूमिकेसाठी त्याला ८० ते १ लाख रुपयांपर्यंत मानधन मिळत होतं.
टॅग्स :टेलिव्हिजनसीआयडीशिवाजी साटमसेलिब्रिटी