Join us  

बालपणीच वडील गेले, आईने घरकामं करून वाढवलं; संघर्षाला मात देत बनली लोकप्रिय स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 5:03 PM

1 / 7
आपल्या हसतमुख स्वभावाने भारतीने चाहत्यांच्या मनावर जादू केली. विनोदाचे षटकार मारत तिने कायमच प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडलं.
2 / 7
आज भारती कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. पण तिला इथपर्यंत पोहचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.
3 / 7
'लाफ्टर क्वीन' भारती सिंगचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. तिने आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे. भारती सिंग २ वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर भारतीच्या आईने मुलांचं संगोपन करण्यासाठी घरकाम केलं.
4 / 7
एका मुलाखतीत भारतीने तिच्या आयुष्यातील संघर्षावर भाष्य केलं. ऐन सणासुदीच्या काळात त्यांच्याकडे ना खायला जेवण असायचं ना घालायला चांगले कपडे असायचे. तिची संघर्षंमय कहाणी वाचून डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
5 / 7
भारतीचं नशीब 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोमुळे पालटलं. २००८ मध्ये तिने या कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतरही तिला वजनावरून अनेकांनी ट्रोल केलं, तरीही भारती डगमगली नाही.
6 / 7
सध्या ही 'लाफ्टर क्वीन' तिच्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहे. २०१७ मध्ये ती हर्ष लिंबिचियासोबत लग्नबंधनात अडकली. तिला एक गोंडस मुलगा देखील आहे.
7 / 7
मीडिया रिपोर्टनुसार, भारती सिंगची नेटवर्थ जवळपास २५ कोटी इतकी आहे. 'कॉमेडी नाईट् विथ कपील', 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' यासोबत वेगवेगळे रिएलिटी शोही तिने होस्ट केले आहेत.
टॅग्स :भारती सिंगटिव्ही कलाकारप्रेरणादायक गोष्टी