पती अन् चिमुकल्या लेकींसह श्रीलंकेहून परतली, झाली संसर्गाची शिकार; लेकींपासून राहावं लागतंय दूर By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 2:35 PM1 / 9टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी सध्या छोट्या पडद्यापासून दूर आहे. देबिनाने काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला आहे. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर लगेच त्याच वर्षी तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला2 / 9देबिना पती गुरमीत आणि दोन्ही मुलींसोबत श्रीलंका ट्रीपवर गेली होती. मात्र तिथून परत येताच तिला कुटुंबापासून दूर राहावं लागत आहे.3 / 9देबिनाला इन्फ्लुएंझा व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तिने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत याची माहिती दिली.4 / 9सुदैवाने तिच्या दोन्ही मुली आणि गुरमीत हे निगेटिव्ह आले आहेत. सध्या देबिना रिकव्हरी स्टेजमध्ये आहे.5 / 9इन्फ्लुएंझा बी व्हायरस पॉझिटिव्ह आले आहे. वेल, हॅंग ऑव मम्मा!माझ्या बाळांपासून दूर राहात आहे. आईपण सोपं नाही. मला ताप आणि सर्दी ही लक्षणं आहेत.6 / 9देबिनाची ही मुलींसोबत पहिली आंतरराष्ट्रीय ट्रीप होती. तिने श्रीलंका हॉलिडेचे अनेक फोटो व्हिडिओ शेअर केले होते.7 / 9६ नोव्हेंबर २०२२ रोजी देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा आई-बाबा झाले.लग्नाच्या 11 वर्षानंतर या जोडप्याला एप्रिल 2022 मध्ये एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी लियाना ठेवले. त्यांनी त्यांच्या लहान मुलीचे नाव दिविशा ठेवले आहे. 8 / 9दिविशा प्री-मॅच्युअर होती म्हणून देबिना आणि गुरमीतने आपल्या बाळाला बराच काळ लाइमलाइटपासून दूर ठेवले होते.9 / 9देबिना अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे, पण तिच्या 'देबिना डीकोड्स' या यूट्यूब चॅनलद्वारे तिच्या चाहत्यांशी कनेक्ट आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications