Join us

वयाची पन्नाशी उलटली तरीही टीव्ही अभिनेत्री सिंगल, लग्नाशिवायच बनली एका मुलीची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 2:17 PM

1 / 9
कलाकार बॉलिवूडचा असो किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतला, संघर्ष कोणालच चुकलेला नाही. अशीच एक अभिनेत्री जिला इंडस्ट्रीत खूप स्ट्रगल करावा लागला आणि तिने स्वतःच्या हिमतीवर इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं. ही अभिनेत्री म्हणजे साक्षी तंवर.
2 / 9
राजस्थानमधील अलवर येथे जन्मलेली अभिनेत्री साक्षी तंवर ही राजपूत कुटुंबातील आहे. तिने केंद्रीय विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
3 / 9
अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी अभिनेत्रीने फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून काम केले. पदवीनंतर तिने प्रशासकीय सेवा आणि जनसंवादाची तयारी सुरू केली आणि याच काळात तिला सुवर्णसंधी मिळाली.
4 / 9
साक्षीने १९९८ मध्ये दूरदर्शनच्या चित्रपट गाण्यावर आधारित शो 'अलबेला सूर मेला'साठी ऑडिशन दिली आणि प्रेझेंटर म्हणून तिची निवड झाली. यानंतर अभिनेत्रीला 'कहानी घर घर की' या टीव्ही सीरियलमध्ये पार्वती अग्रवालची भूमिका मिळाली ज्यामुळे ती घराघरात पोहचली.
5 / 9
यानंतर तिने 'बडे अच्छे लगते हैं'मध्ये राम कपूरसोबत प्रिया कपूरची भूमिका साकारली होती. या शोमध्ये दोघांची जोडी खूप आवडली होती.
6 / 9
टीव्हीशिवाय साक्षी तंवरने बॉलिवूडमध्येही नशीब आजमावले. अभिनेत्रीने २०१६ मध्ये आमिर खान स्टारर 'दंगल' चित्रपटात कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या पत्नी दया कौरची भूमिका साकारली होती.
7 / 9
यानंतर ती मनोज बाजपेयी, नीना गुप्ता, 'डायल १००' मध्येही दिसली होती. तिने ZEE5 ची सीरिज 'करले तू भी मोहब्बत' मधून OTTवर पदार्पण केले.
8 / 9
याशिवाय ती 'द फायनल कॉल', 'मिशन ओव्हर मार्स' आणि 'माई: अ मदर रेज' यांसारख्या मालिकांमध्येही दिसली.
9 / 9
दमदार कारकीर्द आणि सुंदर अभिनय असूनही साक्षी तंवर स्थिरावली नाही. ५१ वर्षीय अभिनेत्रीने आजपर्यंत लग्न केलेले नाही. लग्नाशिवाय ती एका मुलीची आई झाली आहे. २०१८ साली साक्षीने ९ महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतले होते, तिचे नाव तिने दित्या तंवर ठेवले आहे. अभिनेत्री आपल्या मुलीसोबत आनंदी जीवन जगत आहे.