तू आणि तूच! किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरचं रोमँटिक फोटोशूट, लवकरच अडकणार लग्नबंधनात?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 04:59 PM2024-11-29T16:59:45+5:302024-11-29T17:21:29+5:30

किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर या जोडीने नुकतीच प्रेमाची कबूली दिल्यावर सोशल मीडियावर रोमँटिक फोटोशूट केलंय

देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली असून तो अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे

किरणने वैष्णवीसोबतचे फोटो पोस्ट करुन सर्वांना ही खास बातमी सांगितली आहे. किरण आणि वैष्णवी यांनी 'देवमाणूस 2' मध्ये एकत्र काम केले होते

गावाकडील शेतात किरण आणि वैष्णवीने हे फोटोशूट केलंय. न्यू कपल इन टाऊन अशा कमेंट्स दोघांचेही चाहते करत आहेत

वैष्णवी सध्या तिकळी मालिकेत अभिनय करत असून किरणने सध्या 'चौक' आणि 'नाद' अशा मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय

सध्या अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच नुकतंच प्रेमाची कबुली देणारे किरण-वैष्णवी लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे

किरणने हीच माझी होम मिनिस्टर असं कॅप्शन देत हे खास फोटोशूट केलंय. दोघांच्याही चाहत्यांना या बातमीने सुखद धक्का बसलाय

"यापुढे संपूर्ण आयुष्य तुझ्या तालावर चालायचंय", "तू आणि तूच" असं खास रोमँटिक कॅप्शन देत किरण गायकवाडने वैष्णवीसोबत खास फोटोशूट केलंय