तू आणि तूच! किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरचं रोमँटिक फोटोशूट, लवकरच अडकणार लग्नबंधनात? By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 4:59 PM1 / 7देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली असून तो अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे2 / 7किरणने वैष्णवीसोबतचे फोटो पोस्ट करुन सर्वांना ही खास बातमी सांगितली आहे. किरण आणि वैष्णवी यांनी 'देवमाणूस 2' मध्ये एकत्र काम केले होते3 / 7गावाकडील शेतात किरण आणि वैष्णवीने हे फोटोशूट केलंय. न्यू कपल इन टाऊन अशा कमेंट्स दोघांचेही चाहते करत आहेत4 / 7वैष्णवी सध्या तिकळी मालिकेत अभिनय करत असून किरणने सध्या 'चौक' आणि 'नाद' अशा मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय5 / 7सध्या अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच नुकतंच प्रेमाची कबुली देणारे किरण-वैष्णवी लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे6 / 7किरणने हीच माझी होम मिनिस्टर असं कॅप्शन देत हे खास फोटोशूट केलंय. दोघांच्याही चाहत्यांना या बातमीने सुखद धक्का बसलाय7 / 7'यापुढे संपूर्ण आयुष्य तुझ्या तालावर चालायचंय', 'तू आणि तूच' असं खास रोमँटिक कॅप्शन देत किरण गायकवाडने वैष्णवीसोबत खास फोटोशूट केलंय आणखी वाचा Subscribe to Notifications