Join us

नवरात्र अन् मॅटर्निटी फोटोशूट, देवोलिनाच्या फोटोंनी वेधलं लक्ष, अभिनेत्रीने फ्लॉन्ट केला बेबी बंप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:13 PM

1 / 7
टीव्हीवरील गोपी बहू लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने काही दिवसांपूर्वीच ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती.
2 / 7
आता नवरात्रीनिमित्त देवोलिनाने खास मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3 / 7
पांढऱ्या रंगाची साडी नेसून देवोलिनाने खास बंगाली लूक करत हे फोटोशूट केलं आहे.
4 / 7
फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सी ग्लो स्पष्ट दिसत आहे. देवोलिनाने बेबी बंपही फ्लॉन्ट केला आहे.
5 / 7
साथ निभाना साथिया या मालिकेतून देवोलिना घराघरात पोहोचली. या मालिकेतील गोपी बहूने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
6 / 7
देवोलिनाने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली होती.देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे.
7 / 7
लग्नानंतर आता दोन वर्षांनी देवोलिना आणि शाहनवाज आईबाबा होणार आहे. नव्या पाहुण्याची चाहुल लागल्याने त्यांचे कुटुंबीयही आनंदी आहेत.
टॅग्स :देवोलिना भट्टाचार्जीटिव्ही कलाकार