'माझी तुझी रेशीमगाठ' अभिनेत्री स्वाती देवलचा पतीसुद्धा आहे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा, जाणून घ्या त्याच्याविषयी By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 9:09 AM1 / 10‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath ) ही प्रेक्षकांची आवडती मालिका. पण आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. यशचं गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि यश व नेहाचा मोठा अपघात होतो. या अपघातात नेहा कारमधून खाली दरीत पडते. तर, यश जखमी होतो. या अनपेक्षित ट्विस्टनंतर काही दिवस नेहा मालिकेतून गायब होती. पण आता ती पुन्हा एकदा मालिकेत परतली आहे. अर्थात नेहा म्हणून नाही तर अनुष्का बनून.(Photo Instagram) 2 / 10माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. त्यामुळे ही मालिका लोकप्रिय होत आहे. यश, परी, नेहा यांच्याप्रमाणेच लोकप्रिय झालेली व्यक्तीरेखा म्हणजे नेहाच्या वहिनी.(Photo Instagram) 3 / 10प्रचंड बडबड आणि सतत नेहामागे अनेक गोष्टींसाठी तगादा लावणारी मिनाक्षी लोकप्रिय होत आहे. त्यामुळेच या लोकप्रिय ठरत असलेल्या मिनाक्षीची रिअल लाईफ कशी आहे ते पाहुयात. (Photo Instagram) 4 / 10मिनाक्षीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव स्वाती देवल आहे. स्वातीने कुंकू', 'कळत नकळत', 'पारिजात', 'वादळवाट', 'विवाहबंधन', 'फु बाई फु', 'पुढचं पाऊल' यांसह अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. (Photo Instagram)5 / 10मराठीतच नव्हे तर हिंदीतही स्वातीने काम केले आहे.'मिसेस तेंडुलकर' या गाजलेल्या मालिकेतही स्वातीने भूमिका साकारली होती.(Photo Instagram) 6 / 10स्वातीचा पतीदेखील छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा आहे. तो चला हवा येऊ द्या या शोमध्ये संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळतो.त्याचबरोबर काही विनोदी स्कीटमध्येही त्याचा सहभाग असतो. या शोमुळे तुषारही घराघरात पोहोचला आहे.(Photo Instagram) 7 / 10तुषार आणि स्वाती सोशल मीडियावर अनेकवेळा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. (Photo Instagram) 8 / 10तुषारने 'घडलंय बिघडलंय', 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज', 'रणवीर कॅफे', 'हास्यसम्राट' अशा अनेक शोजसाठी त्याने संगीत संयोजक म्हणून भूमिका बजावली आहे. (Photo Instagram) 9 / 10स्वाती आणि तुषार यांचे लव्हमॅरेज आहे. काही वर्ष डेट केल्यानंतर 2003 मध्ये दोघांनीही लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. तुषारला इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. (Photo Instagram) 10 / 10त्याच्या संघर्षात पत्नी स्वातीनेही त्याला साथ दिली. त्याच्या प्रत्येकवेळी स्वाती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली. आज दोघेही आपापल्या क्षेत्रात नाव कमावत असून सुखाने दोघांचा संसार सुरु आहे.(Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications