मराठमोळी अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या लेकीला पाहिलंत?, दिसायला आई इतकीच आहे सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 7:00 AM1 / 10एकाहून एक धमाकेदार भूमिकेतून मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री सुलेखा तळवळकर यांना कोण ओळखत नाही. कधी आई, कधी सासूच्या भूमिकेत सुलेखा तळवलकर घराघरात पोहोचल्या. पण आज आम्ही सुलेखा यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या लेकीबद्दल सांगणार आहोत.2 / 10सुलेखा किती सुंदर आहेत, हे वेगळी सांगायची गरज नाही. त्यांची लेकही त्यांच्याइतकीच सुंदर आहे. 3 / 10सोशल मीडियावर सुलेखा तळवलकर प्रचंड सक्रीय असतात. मालिका आणि विविध प्रोजेक्टस, खासगी आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसह शेअर करत असते. सुलेखा आपल्या मुलीसोबतचे खास फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतात. 4 / 10सुलेखा यांची मुलगीही त्यांच्यासारखीच सुंदर दिसते. सध्या सोशल मीडियावर माय लेकींचे फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स मिळतात.5 / 10सुलेखा यांच्या लेकीचं नाव टिया आहे. आई इतकीच सुंदर दिसणाऱ्या टियाच्या फोटोंवर चाहते फिदा आहेत. तिचे फोटो पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.6 / 10सुलेखा यांची वेगळी ओळख करुन द्यायला नको. सुलेखा यांनी अंबर तळवलकरसह लग्न केले आहे. अंबर तळवलकर हा स्मिता तळवलकर यांच्या मुलगा आहे. सुलेखा दिवंगत स्मिता तळवलकर यांच्या सून आहेत.7 / 10अंबर आणि सुलेखा यांना दोन मुलं आहेत. आर्य आणि टिया अशी मुलांची नावं आहेत. प्रत्यक्ष जीवनात टिया कशी आहे हे तुम्हालाही जाणून घ्यायची इच्छा असेल.8 / 102021 मध्ये टियाने सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. तिला ‘मिस दादर 2021’ या सौंदर्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं होतं.9 / 10टियाला ज्वेलरी डिझाईनिंगमध्ये करण्याची आवड असून वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवायला तिला आवडतात. आईसोबत टिया वेगवेगळ्या रेसिपी युट्युब चॅनलवर शेअर करताना दिसून येते.10 / 10तळवलकर ग्रुप्सचे विविध ठिकाणी फिटनेस सेंटर आहेत. याचेही कामकाज ती सांभाळते. टियाने आई आणि आजीप्रमाणे अभियक्षेत्रात एंट्री केली नसली तरी तिची आवड जपत हटके काम करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications