वैभव मांगलेच्या पत्नीला पाहिलंत का?, सौंदर्यात मराठमोळ्या अभिनेत्रींनाही देते टक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 12:09 PM1 / 11अभिनेता वैभव मांगलेला कोणत्याही परिचयाची गरज नाही. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने त्याने रसिकांच्या मनात छाप उमटविली आहे.2 / 11 उत्तम अभिनयाबरोबर वैभव मांगले त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. 3 / 11सध्या तो चंद्रविलास मालिकेत काम करताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत त्याने भूताची भूमिका साकारली आहे. 4 / 11मालिकेव्यतिरिक्त अभिनेता सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतो. दरम्यान आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पत्नीसोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.5 / 11अभिनेता वैभव मांगलेने पत्नीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, यशस्वी सहजीवनाची १६ वर्षे पूर्ण . उत्तम साथीदार लाभण्या सारखं सुख नाही .भाग्य नाही. त्याच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. 6 / 11वैभव मांगले सोशल मीडियावर बऱ्याचदा पत्नी आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 7 / 11वैभव मांगलेचा जन्म ७ जून, १९७५ रोजी देवरुख रत्नागिरी महाराष्ट्र येथे झाला. 8 / 11मांगलेने आपल्या अभिनय कारकीर्दीला रंगभूमीपासून सुरुवात केली आणि १९९६ मध्ये हवालदार झाला. मुंबईचा पाहुणा या मराठी नाटकातून पदार्पण केले. 9 / 11२००४मध्ये नवरा माझा नवसाचामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. अलबत्या गलबत्या नाटकातून त्याने साकारलेली चींची चेटकीण लहान मुलांना खूपच भावली. 10 / 11स्वराज्य आणि कट्यार या लघुपटांचे लेखन आणि दिग्दर्शनही केले. एक डाव भटाचा हे त्यांचे गाजलेले व्यावसायिक नाटक आहे. 11 / 11चित्रपटांव्यतिरिक्त मांगलेने एक गाव भुताचा, मालवणी डेज, माझे पती सौभाग्यवती आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मालिकेतही काम केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications