Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांच्या नवऱ्याला पाहिलंत का? कलाविश्वाशी संबंध असला तरी लाइमलाइटपासून राहतात दूर By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:41 PM1 / 12अभिनेत्री वर्षा उसगांवकर सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाल्या आहेत. 2 / 12वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात दमदार गेम खेळताना देखील दिसत आहेत. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. 3 / 12वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चला तर मग आज जाणून घेऊयात वर्षा उसगांवकर यांच्या पतीबद्दल4 / 12वर्षा उसगांवकर यांच्या पतीचे नाव अजय शर्मा असून त्यांचा कलाविश्वाशी संबंध आहे. त्यांचा सिनेविश्वाशी संबंध असला तरी लाइमलाइटपासून दूर राहतात.5 / 12वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचा मुलगा अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले असून वर्षाचे पती अनेकवेळा त्यांच्यासोबत इव्हेंटमध्ये दिसतात. 6 / 12वर्षा उसगांवकर आणि अजय शर्मा यांचे मार्च २०००मध्ये लग्न झाले असून त्यांच्या लग्नाला २४ वर्षे झाली आहेत. 7 / 12अजय शर्मा यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते.8 / 12मराठी इंडस्ट्रीत १९८०-१९९० या कालावधीत आपल्या सुंदर अदाकारीमुळे प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे नाव घेतले जाते. 9 / 12वर्षा यांनी दिग्गज कलाकार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि नितीन भारद्वाज यांच्यासोबत त्या अनेक चित्रपटात झळकल्या होत्या. 10 / 12गंमत जंमत, खट्याळ सासू नाठाळ सून, सगळीकडे बोंबाबोंब, मज्जाच मज्जा, हमाल दे धमाल, कुठं कुठं शोधू मी तिला, भुताचा भाऊ, पसंत आहे मुलगी, आमच्या सारखे आम्हीच, शेजारी शेजारी, पटली रे पटली, घनचक्कर, मुंबई ते मॉरिशस, ऐकावं ते नवलच, एक होता विदूषक असे अनेक त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.11 / 12शेवटच्या वर्षा उसगांवकर स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत पाहायला मिळाल्या. 12 / 12या मालिकेतून त्यांनी एक्झिट घेतल्यानंतर त्यांनी बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री केली. आणखी वाचा Subscribe to Notifications