PHOTOS: 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाच्या खऱ्या आयुष्यातील यशला पाहिलंत का?, सिनेइंडस्ट्रीतला आहे तो प्रसिद्ध चेहरा By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 6:00 AM1 / 10छोट्या पडद्यावर काही महिन्यांपूर्वीच सुरु झालेली लोकप्रिय मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. (Photo Instagram) 2 / 10त्यामुळे या मालिकेच्या प्रत्येक भागाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांच्या लग्नाची लगबग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. (Photo Instagram) 3 / 10नेहा आणि यशाच्या लग्नाची चर्चा सर्वत्र चालू आहे. नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा पार पडला. नेहा आणि यशाच्या लग्नसोहळ्याचा थाट काही वेगळाच आहे. (Photo Instagram) 4 / 10मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना खूप आवडतेय. नेहाच्या खऱ्या आयुष्यातील यशला पाहिलंत का?, त्याचा देखील सिने इंडस्ट्रीशी जवळचा संबंध आहे. (Photo Instagram) 5 / 10प्रार्थना अनेकवेळा पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. फोटोंमध्ये दोघांमधील बॉन्डिंग दिसून येत. (Photo Instagram) 6 / 10प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत लग्नगाठ बांधली. (Photo Instagram) 7 / 10विवाह मंडळाच्या माध्यमातून प्रार्थनासाठी अभिषेकचं स्थळ आलं आणि 14 नोव्हेंबर 2017 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. (Photo Instagram) 8 / 10अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. लेखक, दिग्दर्शक अशीही त्याची ओळख आहे. (Photo Instagram) 9 / 10डब्बा ऐस पैस, शुगर, सॉल्ट आणि प्रेम या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. (Photo Instagram) 10 / 10मिसिंग ऑन अ वीकेंड या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications