Join us

वडिलांच्या मृत्यूनंतर सातच दिवसांत दिव्या अग्रवालने केले ग्लॅमरस फोटोशूट; झाली ट्रोल,असे दिले उत्तर

By रूपाली मुधोळकर | Published: November 05, 2020 10:26 AM

1 / 11
टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिच्या वडीलांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. पण हे काय? वडिलांच्या निधनानंतर सातच दिवसांत दिव्याने सोशल मीडियावर ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर केलेत.
2 / 11
वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करणारी दिव्या मग जबरदस्त ट्रोल झाली. चाहत्यांनी तिला नाही नाही ते सुनावले.
3 / 11
वडिलांच्या मृत्यूनंतर सातच दिवसात हे असले फोटोशूट करताना तुला लाज वाटली नाही का? असा सवाल करत तिला काही युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले.
4 / 11
तुझ्यासाठी वडील नाही तर पैसा महत्त्वाचा आहे. पैशांसाठी तू इतक्या लवकर वडिलांनाही विसरली, असे काय काय युजर्सनी तिला सुनावले.
5 / 11
मात्र या ट्रोलिंगचा दिव्यावर काहीही परिणाम झाला नाही. उलट तिने ट्रोल करणा-यांना खरमरीत उत्तर दिले.
6 / 11
ट्रोलर्सच्या पोस्टचे स्क्रिनशॉट्स शेअर करत, ट्रोल करणा-यांबद्दल तिने संताप व्यक्त केला.
7 / 11
या क्षणी मी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे? वडिलांचे निधन हे माझ्या आयुष्यातील कधीही भरुन न निघणारे दु:ख आहे. पण म्हणून मी केवळ रडत बसावे, असे तुम्हाला वाटतेका? खरोखर हे जग खूप क्रूर आहे. लोकांना दु:खात बघून आनंद मानणा-या लोकांची इथे कमतरता नाही, अशी संतप्त पोस्ट तिने केली.
8 / 11
वडिलांच्या निधनानंतर दोनच दिवसांनी मी कामावर परतत असल्याची पोस्ट दिव्याने केली होती. शो मस्ट गो आॅन, मी एक हिंमतवान मुलगी आहे. माझ्या वडिलांना माझा अभिमान वाटावा, असे मी करेल, असे ही पोस्ट शेअर करताना ती म्हणाली होती.
9 / 11
दिव्या अग्रवाल ही सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.
10 / 11
अलिकडेच तिने महिलांवर होणा-या अत्याचाराविरोधात ‘नो वुमन नो क्राईम’ असे म्हणणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमुळे ती ट्रोल झाली होती.
11 / 11
दिव्या ‘स्प्लिट्विला’ आणि ‘एस आॅफ स्पेस’ यासारख्या शोमध्ये झळकली आहे. ‘रागिनी एमएसएस- रिटर्न्स’ या हॉरर वेबसीरिजच्या सीझन 2 मध्ये दिव्याने टायटल रोल साकारला होता.
टॅग्स :टेलिव्हिजन