Join us

मोलकरणीचं काम, अंबानींच्या लग्नात बनली वाढपी; आज कोट्यवधींची संपत्ती असलेली ही अभिनेत्री कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 2:03 PM

1 / 12
फोटोत दिसणारी ही चिमुकली 'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाते. काही जण संघर्ष करुन नाव कमवतात, यश मिळवतात. पण या मुलीच्या बाबतीत वेगळं घडलं. तिने संघर्ष तर केला पण कायम वादग्रस्त राहिली.
2 / 12
पहिलं लग्न, घटस्फोट आणि मग गेल्या वर्षीच आंतरधर्मीय विवाह केला. यातही पतीवर मारहाणीचा आरोप करत त्याला तुरुंगात पाठवलं. माध्यमांसमोर कसेही आरोप केले आणि ही ड्रामा क्वीन कायम वादग्रस्तच राहिली.
3 / 12
वयाच्या १० व्या वर्षीपासून ती काम करत आहे. कधी घरोघरी जाऊन मोलकरीण म्हणून काम केलं तर कधी वाढपीही बनली. यासाठी तिला १०० ते २०० रुपये मिळायचे. मात्र आज याच अभिनेत्रीकडे तब्बल ३७ कोटींची संपत्ती आहे.
4 / 12
ही अभिनेत्री आहे 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant). घरातून विरोध असतानाही तिने सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवले. राखी उत्तम डान्स करते. फराह खानच्या 'मै हू ना' मध्ये ती छोट्या भूमिकेत झळकली होती.
5 / 12
राखीचं खरं नाव नीरु भेडा आहे. तिची आई जया भेडा यांनी पोलिस कॉन्स्टेबल आनंद सावंत यांच्याशी दुसरं लग्न केलं. २५ सप्टेंबर १९७८ रोजी राखीच जन्म झाला.
6 / 12
राखीचं लहानपण खूप गरिबीत गेलं. अनिल अंबानी यांच्या लग्नात तिने वाढपीचं काम केलं होचतं. तिला याचे ५० रुपये मिळाले होते. यानंतर वयाच्या ११ व्या वर्षी तिने एका दांडिया महोत्सवात भाग घ्यायची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिच्या आईने तिला खूप मारलं आणि तिचे केसही कापले. यानंतर तिने आई वडिलांच्या विरोधात जाऊन काम करण्याचं ठरवलं.
7 / 12
राखीने विलेपार्ले येथील गोकलीबाई हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं. नंतर तिने मिठीबाई कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याचवेळी तिने फिल्मी जगात एन्ट्री केली. ती अनेक निर्मात्यांना भेटली मात्र रिजेक्ट झाली. याचमुळे तिने कॉस्मेटिक सर्जरी करुन स्वत:चा चेहरामोहराच बदलला.
8 / 12
१९९७ साली राखीने 'अग्निचक्र' सिनेमातून पदार्पण केलं.'जोरु का गुलाम','जिस देश मे गंगा रहता है','ये रास्ते है प्यार के' सिनेमांमध्ये काम केलं.
9 / 12
२००३ मध्ये रिलीज झालेल्या 'मोहब्बत है मिर्ची'मध्ये राखीने डान्स केला होता. या गाण्याने 'ड्रामा क्वीन'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि ती लाईमलाईटमध्ये आली. राखी सावंत कायमच वादविवादांमध्ये घेरलेली होती.
10 / 12
डान्सर अभिषेक अवस्थीसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. यानंतर तिने नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयंवर रचलं आणि NRI इलेश परुजनवालाशी साखरपुडा केला. मात्र नंतर नातं तोडलं.
11 / 12
2019 साली राखीने NRI रितेशसोबत गुपचूप विवाह केला. मात्र नंतर त्यांचाही घटस्फोट झाला. दोघंही बिग बॉसमध्ये सामील झाले होते. रितेशला राखीसोबत राहायचं नसल्याने तो यूकेला पळाला असं ती म्हणाली होती.
12 / 12
गेल्या वर्षी राखीने आदिल दुर्रानीसोबत लग्न केलं. त्यांचं नातं फारच वादग्रस्त राहिलं. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले. राखीच्या आरोपांमुळे आदिलला तुरुंगातही जावं लागलं. अजूनही त्यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. राखी सावंत म्हणूनच 'कॉन्ट्रोवर्शियल क्वीन' म्हणून प्रसिद्ध झाली आहे.
टॅग्स :राखी सावंतबॉलिवूडबिग बॉसटिव्ही कलाकार