Join us  

पतीसोबतचे संपले नातेसंबंध, ९ वर्षांचा मोडला संसार, आता लेकीसोबत जुही परमार अशी जगतेय आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 10:09 AM

1 / 8
अभिनेत्री जुही परमार गेल्या २५ वर्षांपासून टीव्हीच्या दुनियेत कार्यरत आहे. चाहत्यांना तिला कुमकुमच्या भूमिकेत पाहायला आवडते. या मालिकेतून जुहीला प्रत्येक घराघरात विशेष ओळख मिळाली.
2 / 8
'कुमकुम' या टीव्ही मालिकेतून चाहत्यांचे उदंड प्रेम मिळालेली अभिनेत्री जुही परमार एकेकाळी इंडस्ट्रीची लोकप्रिय स्टार होती. लोकांना जुहीचा सुंदरपणा आणि साधेपणा खूप आवडला.
3 / 8
लग्नानंतर या अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, त्यानंतर जुही ग्लॅमरच्या जगापासून दूर राहू लागली. माजी पती सचिन श्रॉफपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती मालिकांमध्ये कमी दिसते.
4 / 8
जुही परमारने तिच्या करिअरची सुरुवात 1998 मध्ये 'वोह' या टीव्ही शोमधून केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी ती 'चुरियन' आणि 'ये जीवन है'मध्ये दिसली. जुहीने पुन्हा ब्रेक घेतला आणि 'कुमकुम'मधून टीव्हीवर कमबॅक केले. २००२ मध्ये आलेल्या या शोने जुहीला टीव्हीची क्वीन बनवले.
5 / 8
जेव्हा अभिनेत्रीचे व्यावसायिक जीवन चांगले चालले होते, तेव्हा तिची आणि अभिनेता सचिन श्रॉफची जोडी टीव्हीवर सर्वाधिक लोकप्रिय असायची. या जोडप्याने २००९ मध्ये डेटिंग केल्यानंतर लग्न केले.
6 / 8
त्यानंतर २०१३ मध्ये जुहीने मुलीचे स्वागत केले. काही काळानंतर जुही आणि सचिनच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ लागल्या.
7 / 8
यानंतर २०१८ साली जुही आणि सचिनचा घटस्फोट झाला आणि मुलीचा ताबा जुहीला मिळाला. आता जुही तिची मुलगी समायरा एकटीच वाढवत आहे. ती आपल्या मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
8 / 8
याशिवाय अभिनेत्री लाइमलाइटपासूनही दूर राहते. सध्या जुही तिचा सगळा वेळ मुलीसोबत व्यतित करत आहे.