Join us

Tejaswi Prakash: नागिन ६ च्या सेटवर दिसला तेजस्वी प्रकाशचा एथनिक लूक, ट्रेडिशनल रूप केलं फ्लॉन्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 10:10 AM

1 / 9
बिग बॉस १५ चे विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये गुंतली आहे. नुकतीच ती नागिन ६ च्या सेटवर दिसून आली. यावेळी ती एथनिक आऊटफिटमध्ये दिसती. या वेशात ती खूप सिंपल आणि सुंदर दिसत होती.
2 / 9
तेजस्वी प्रकाश ही नागिन ६ मालिकेमध्ये इच्छाछारी नागिनीची भूमिका बजावणार आहे. बिग बॉस १५ संपल्यानंतर तेजस्वीने लगेच नागिन ६ च्या चित्रिकरणाला सुरुवात केली आहे. ती नुकतीच शोच्या सेटवर स्पॉट झाली होती. तिचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
3 / 9
तेजस्वी प्रकाश मंगळवारी संध्याकाळी पवईमध्ये नागिन ६ च्या शोच्या सेटवर स्पॉट झाली. यावेळी ती एथनिक ड्रेसमध्ये दिसून आली. तिने सलवार आणि पायजमा परिधान केला होता. तसेच त्यावर मॅचिंग ओढणीही घेतली होती.
4 / 9
तेजस्वीने केस बांधले होते. तसेच या रूपात ती खूप सुंदर दिसत होती. यामध्ये ती खूप सिंपल लूकमध्ये दिसत होती.
5 / 9
तेजस्वी प्रकाशने तिच्या हातात मोबाईल घेतला होता. ती फोटोग्राफरना पोझ देताना मोबाईल पाहण्यात व्यस्त होती.
6 / 9
तेजस्वी प्रकाशला या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाला सुरुवात करण्यापूर्वी पालक आणि बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत वेळ घालवण्यासाठी केवळ एक दिवसाचा वेळ मिळाला होता.
7 / 9
नागिन ६ च्या निर्मात्यांनी एक दिवसापूर्वी तेजस्वी प्रकाशकडे ट्रायलसाठी कपडे पाठवले. तसेच तेजस्वीने ट्रायसुद्धा केले.
8 / 9
शो च्या प्रॉडक्शनशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, नागिन ६ मध्ये तेजस्वी प्रकाश सोबत बिग बॉस १५ मधील सहकलाकार असलेला सिंबा नागपाल हासुद्धा असणार आहे.
9 / 9
नागिन ६ आतापर्यंतचा सर्वात महागडा सिझन असणार आहे. निर्माती एकता कपूर ही नागिन ६ ही मालिका १३० कोटी रुपयांचे भरभक्कम बजेट खर्चून तयार करत आहे.
टॅग्स :तेजस्वी प्रकाशटेलिव्हिजनबॉलिवूड