Urfi Javed Chetan Bhagat: "मुलं चादरीत लपून तिचे फोटो बघतात, जॉब इंटरव्ह्यूमध्ये काय सांगाल- मला उर्फीचे..." By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 6:01 PM1 / 7Urfi Javed Chetan Bhagat: उर्फी जावेद ही तिच्या बोल्ड फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आली होती, पण त्या शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. त्यानंतर कमालीच्या बोल्ड फॅशन ड्रेसिंगमुळे तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.2 / 7उर्फी केवळ एकाच कारणामुळे चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. बोल्ड लुकमुळे उर्फी अनेकदा ट्रोल होते.3 / 7असे असले तरी तिच्या या फॅशनचा चाहतावर्ग बराच आहे. याचदरम्यान लोकप्रिय लेखक चेतन भगत यांनी 'फॅशन क्वीन' उर्फी जावेदबद्दल बोलताना काही महत्त्वाची विधाने केली. चेतन भगत सोशल मीडिया सेन्सेशन उर्फीबद्दल काय म्हणाले जाणून घेऊया.4 / 7'इंटरनेट आणि डेटा ही चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे आजची तरुणाई काही अंशी बिघडत चालली आहे. कमकुवत झाली आहे. मुले दिवसभर फोनवर रील्स बघत बसतात. फोटो लाईक करत राहतात. तरुणांना उर्फी जावेदचे फोटो आवडतात. मी देखील काही वेळा सोशल मीडिया पाहत असतो'5 / 7'उर्फी जावेद जे करते त्यात तिची काहीच चूक नाही. ती तिचं करिअर घडवत आहे. खरी समस्या अशी आहे की आजकाल तरूण लोक चादरीच्या आत घुसून लपूनछपून उर्फी जावेदचे फोटो पाहत आहेत. असं केलंत तर जॉबच्या इंटरव्ह्यूमध्ये काय सांगाल, मला उर्फीचे सगळे ड्रेस माहिती आहेत... अशाने नोकरी मिळणार आहे का?' असे चेतन भगत म्हणाले.6 / 7'लोक त्या उर्फीचे फोटो दिवसभर बघतच राहतात. उर्फीचे फोटो मी पण पाहिलेत, असे लोक भेटतच असतात. पण आपण एखाद्या गोष्टीत किती वेळ द्यायचा हे आपणच ठरवलं पाहिजे,' असा सल्ला चेतन भगत यांनी तरूण पिढीला दिला.7 / 7उर्फी जावेद व्यतिरिक्त चेतन भगत उल्लू टीव्ही अँप बाबतही बोलले. 'उल्लू म्हणजे काय तर घुबड जे रात्री जागे असते. तसेच उल्लू टीव्ही म्हणजे रात्री दिसणारा. आमच्या वेळी मनोरंजनाची साधने कमी होती, त्यामुळेच मी लिहायला सुरुवात केली. ज्या वयात अभ्यास करायचा असतो, त्यावेळी डेट करण्याची इच्छा होते, पण चांगली मैत्रीण असल्याने नोकरी मिळणार नाही. याउलट चांगली नोकरी असेल तर चांगली मैत्रिण नक्कीच मिळेल' आणखी वाचा Subscribe to Notifications