अखेर सोनल पवार झाली मिसेस पालुष्टे; पाहा 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्रीचा वेडिंग अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 12:28 IST
1 / 8सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. नुकतेच स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर आणि मानसी घाटे-आकाश पंडीत यांनी लग्नगाठ बांधली. 2 / 8त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने लग्न केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे तुला पाहते रे फेम सोनल पवार (Sonal Pawar) . नुकतीच तिने समीर पालुष्टेसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.3 / 8अभिनेत्री सोनल पवार हिने २८ डिसेंबरला समीर पालुष्टेसोबत लग्न केले. सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहे. 4 / 8वधूच्या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. नोव्हेंबरमध्ये या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना खुशखबर दिली होती. 5 / 8तसेच सोनलने हळदी, मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.6 / 8समीर पालुष्टे हा बिझनेसमन आहे. स्पार्कल्स मीडियाचा समीर फाऊंडर आणि सीईओ आहे. याशिवाय समीर डिजिटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणून काम करतो. त्याला भारत सरकारच्या निवडणुक आयोगाकडून पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. 7 / 8सोनल पवारने तुला पाहते रे मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत तिने रुपालीची भूमिका केली होती. 8 / 8याशिवाय तिने घाडगे अँड सून या मालिकेतही काम केले आहे. सध्या ती रमा - राघव मालिकेत झळकत आहे. यात तिने अश्विनीची भूमिका बजावली आहे.