Join us

पहिला घटस्फोट, ३९ वर्षीय अभिनेत्री पुन्हा थाटणार संसार? एकट्याने करतेय लेकीचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:05 IST

1 / 9
अभिनेत्री संजीदा शेख शेवटची हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसोबत फाइटरमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. आता ती संजय लीला भन्साळींच्या हीरामंडीमध्ये दिसणार आहे. आता ती तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री काही वर्षांपूर्वी पती आमिर अलीसोबत वेगळी झाली होती. आता चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, संजीदा दुसऱ्यांदा संसार थाटणार आहे का?
2 / 9
एक हसीना थी, क्या होगा निम्मो का, लव्ह का है इंतजार आणि इश्क का रंग सफेद यासारख्या मालिकेत झळकली आहे. सध्या ती करिअरच्या यशाच्या शिखरावर आहे. शेवटची ती हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसोबत फाइटरमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.
3 / 9
आता ती संजय लीला भन्साळींच्या हीरामंडीमध्ये दिसणार आहे. आता ती तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री काही वर्षांपूर्वी पती आमिर अलीसोबत वेगळी झाली होती. आता चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, संजीदा दुसऱ्यांदा संसार थाटणार आहे का?
4 / 9
आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी संजीदा शेखच्या खऱ्या आयुष्यात अनेक चढउतार आलेले पाहायला मिळाले. तिने २०१२ साली तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड आणि अभिनेता आमिर अलीसोबत लग्न केले होते.
5 / 9
संजीदा आणि आमिरला एक मुलगी आहे. मात्र लग्नाच्या जवळपास १० वर्षांनंतर या कपलने अचानक वेगळे होत असल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. आमिरसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिचे नाव हर्षवर्धन राणेसोबत जोडले गेले होते. मात्र त्या दोघांनी हे नाते स्वीकारले नाही.
6 / 9
संजीदा आणि आमिरने २०२१ विभक्त होत असल्याचे जाहीर केले आणि २०२२मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या वृत्तानंतर संजीदा आणि आमिरचे चाहते नाराज झाले होते. घटस्फोटानंतर आता संजीदा एकटीच लेकीचा सांभाळ करते आहे.
7 / 9
संजीदा कधीच तिच्या आणि आमिरच्या घटस्फोटावर मोकळेपणाने बोलली नाही. मात्र अभिनेत्रीने त्यांच्यात सुसंगतता नसल्याचे कारण सांगितले होते. Galatta सोबत झालेल्या मुलाखतीत संजीदा शेखने म्हटले की, कित्येक लोक आहे, जे आज माझ्याजवळ नाहीत. आज माझ्या जीवनात नसल्यामुळे मला त्यांना प्रेम द्यायचे आहे. कारण ते दूर झाल्याने मी चांगली व्यक्ती बनू शकले.
8 / 9
ती पुढे म्हणाली की, मी आता माझ्या जीवनात खूप खूश आहे. जीवनात असे काही अनुभव असतात, ज्यातून खूप काही शिकायला मिळते. तुम्हाला जीवनात अशा काही लोकांची गरज असते. त्या लोकांनी जे माझ्यासोबत केले, तेदेखील चांगले आहे.
9 / 9
संजीदा शेख आमिर अलीसोबत घेतलेल्या घटस्फोटामुळे खूप चर्चेत आली होती. तिने यावर म्हटले की, माझ्या जीवनात कित्येकदा असा फेज आला जेव्हा मला वाटले की लोक माझ्याबद्दल किती बोलत आहेत. मला कोणालाच स्पष्टीकरण द्यायचे नाही. मग काही बोलले नाही तर लोक आणखी बोलतील.
टॅग्स :संजीदा शेख