Join us  

मालिकांमध्ये बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी! मालिकांमध्ये पाहायला मिळणार गणेशोत्सवासंबंधी खास कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 4:23 PM

1 / 7
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण आहे. गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील सगळ्या मालिकांमध्येही गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.
2 / 7
सगळ्यांची लाडकी मालिका 'तुज माजं सपान' मध्ये वीरू आणि प्राजक्ता हे ओझरला गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मालिकेच्या विशेष भागात त्यांनी ओझरला जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.
3 / 7
सुबोध भावे-शिवानी सोनार यांच्या तू भेटशी नव्याने मालिकेत सुद्धा बाप्पाचं आगमन होणार आहे. मालिकेची टीम एकत्र येऊन गणेशोत्सवाचं सेलिब्रेशन करणार आहे
4 / 7
'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत यामिनी सराफ आणि राजवीर सराफ यांच्या घरात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. त्याशिवाय राजवीर आणि मयूरी हे दोघं पालीच्या गणपती दर्शनालाही जाणार आहेत.
5 / 7
'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेत बयो आणि इरा चक्क मुंबईतून कोकणात बाप्पांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यामुळे मालिकेत कोकणातल्या गणेशउत्सवाचे दर्शन प्रेक्षकांना घेता येईल. या वर्षी गणपती बाप्पांचे आगमन सर्वत्र जोरदार पद्धतीने करण्यात येते आहे.
6 / 7
'भूमिकन्या' मालिकेत लक्ष्मी आपले वडील बळी यांच्याबरोबर बाप्पांची मूर्ती साकारताना दिसणार आहेत. बळी आणि लक्ष्मी यांनी ती मूर्ती एकत्र सेटवरच साकारली आहे आणि मालिकेतले सगळे कलाकार याच मूर्तीची पूजा करताना दिसणार आहेत.
7 / 7
निवेदिता माझा ताई मालिकेतील प्रमुख कलाकारांनीही सेटवर गणपती बाप्पाची मूर्ती बसवत गणेशोत्सव साजरा केलाय. मालिकेच्या टीमने बाप्पाची मनोभावे पूजा करुन प्रार्थना केली
टॅग्स :गणेशोत्सवसेलिब्रिटी गणेशगणेश चतुर्थी २०२४