Join us  

आली गौराई, धनधान्याच्या पावलानं... अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या घरी गौरींचे आगमन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 5:43 PM

1 / 8
गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरींचे. मंगळवारी गौरींचे घरोघरी आगमन झाले. प्रत्येक कुटुंबाने आपापल्या चालिरीती, प्रथेनुसार गौराईचे स्वागत केले.
2 / 8
अभिनेत्री अश्विनी महांगडे गौरी सणासाठी आपल्या गावी गेली आहे.
3 / 8
भिनेत्रीने सोशल मीडियावर गावाकडचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी ती घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवताना पाहायला मिळाली.
4 / 8
अश्विनी महांगडेच्या घरीदेखील गौरीचं आवाहन झालं आहे. तिच्या घरचं गौराईचं मखर अगदी सुंदर सजवल्याचं फोटोत दिसतंय.
5 / 8
अश्विनी चुलीवरच्या भाकरीचा फोटो इस्टा स्टोरीवर शेअर केलाय. 'आज आमच्या गौराईसाठी भाकरी' असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं.
6 / 8
अश्विनीचा सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. तीदेखील या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
7 / 8
अश्विनी महांगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.
8 / 8
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत राणूअक्काची भूमिका केली. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करताना दिसते आहे.
टॅग्स :अश्विनी महांगडेसेलिब्रिटी