ghum hai kisikey pyaar meiin fame vihan verma revealed he faced casting couch at age of 17
"कामाच्या बदल्यात कॉम्प्रोमाइझ..."; वयाच्या १७व्या वर्षी अभिनेत्याने केला कास्टिंग काउचचा सामना By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 4:07 PM1 / 10मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचला सामोरं जावं लागलं आहे. अनेक अभिनेत्रींनी याबाबत खुलासाही केला आहे. आता एका अभिनेत्याने कास्टिंग काउचला सामना केल्याचं म्हटलं आहे. या अभिनेत्याला कामाच्या बदल्यात कॉम्प्रोमाइझ करण्यास सांगितलं होतं.2 / 10'गुम है किसी के प्यार में' या टीव्ही शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता विहान वर्मा याने सांगितलं आहे की, त्याला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. विहानला वयाच्या १७ व्या वर्षी कास्टिंग काउचचा भयंकर अनुभव आला. 3 / 10विहानने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्याचा कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. तो म्हणाला, “माझ्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला मला या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले.'4 / 10'एका ऑडिशन दरम्यान, एका व्यक्तीने मला विचारलं की, मी भूमिकेसाठी माझ्या मूल्यांशी तडजोड करेन का? मी फक्त १७ वर्षांचा होतो आणि घाबरलो होतो. मी नम्रपणे नकार दिला आणि लगेच त्याच्या ऑफिसमधून बाहेर पडलो.'5 / 10'सुरुवातीला मला धक्का बसला होता आणि यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे मला माहीत नव्हतं. मला मुंबईत अशा घटनांची माहिती होती पण माझ्यासोबत असे घडेल असं कधी वाटलं नव्हतं.'6 / 10'स्वतःचं रक्षण करण्यासाठी मी माझा आत्मविश्वास वाढवला आणि इतरांनी माझ्याकडे असं प्रपोझल आणण्याची हिंमत होणार नाही याचीही काळजी घेतली.मी लगेच ही घटना माझ्या मित्रांसोबत शेअर केली.'7 / 10'मी माझ्या आई-वडिलांना सांगायला संकोच करत होतो कारण मला भीती होती की, ते मला अभिनय सोडण्याचा सल्ला देतील. शेवटी जेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवला तेव्हा त्यांनीच माझा आत्मविश्वास वाढवला आणि पूर्ण पाठिंबा दिला.'8 / 10'मला वाटतं की लैंगिक छळ फक्त मनोरंजन क्षेत्रातच नाही तर सर्वत्र आहे. माझ्या मूल्यांशी तडजोड न करता यशस्वी होण्याचा माझा निर्धार होता. मी माझ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करून सुरुवातीच्या इमोशनल ब्रेकडाऊनवर मात केली.'9 / 10विहान वर्माला 'गुम है किसी के प्यार में' या शोमधून घरोघरी ओळख मिळाली आहे. विहान सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तो नेहमीच त्याचे जबरदस्त फोटो शेअर करत असतो. 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications