Join us

Hina khan : "मी डिप्रेशनमध्ये जातेय, खूप दु:खी झालेय; प्रचंड भीती वाटतेय, माणुसकीच संपलीय"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 6:53 PM

1 / 10
अभिनेत्री हिना खान ही अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्लॅमरस फोटोंमुळे की नेहमी चर्चेत असते. पण आता हिना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
2 / 10
36 वर्षीय अभिनेत्री डिप्रेशनमध्ये जात आहे. इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेले युद्ध, तेथील गंभीर परिस्थिती हे यामागचं कारण असल्याचं तिने म्हटलं आहे. भीषण परिस्थिती पाहून तिला खूप भीती वाटत आहे.
3 / 10
'या युद्धाचा माझ्यावर वैयक्तिकरित्या खूप परिणाम झाला आहे. मला ब्रेक घेण्याची गरज वाटू लागली आहे. त्या वेळात मी स्वत:ला सावरू शकते, स्वत:ला समजून घेण्याचा प्रयत्न करेन' असं हिनाने म्हटलं आहे.
4 / 10
इस्रायली हवाई दलाने गाझा पट्टीतील हमासच्या अनेक ठिकाणांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने गाझा पट्टीवर आतापर्यंत 6000 हून अधिक बॉम्ब टाकले आहेत. इस्रायलचा दावा आहे की, त्यांनी हमासची 3600 हून अधिक ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत.
5 / 10
हमासने गाझा पट्टीतून इस्रायलवर हजारो रॉकेट डागले होते. एवढेच नाही तर हमासने हवाई, सागरी मार्ग आणि सीमेद्वारे इस्रायलच्या हद्दीत घुसून नागरिकांवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये हजारे लोकांचा मृत्यू झाला. हमासने शेकडो लोकांना ओलीसही ठेवले. तेव्हापासून इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करत आहे.
6 / 10
हिनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत पोस्ट शेअर केली आहे. 'इस्रायलबाबत सोशल मीडियावर जी काही माहिती समोर येत आहे ती खूप अस्वस्थ करणारी आहे.'
7 / 10
'य़ाचा माझ्यावर परिणाम होत असून मी ड्रिप्रेशनमध्ये जात आहे. खूप वाईट वाटत आहे. मी प्रचंड दु:खी झाले आहे. माणुसकी संपली आहे. ही सर्व परिस्थिती पाहून मला खूप भीती वाटत आहे.'
8 / 10
'सुरू असलेल्या या सर्व गोष्टी माझ्यावर वैयक्तितरित्या परिणाम करत आहेत. मला ब्रेकची अत्यंत गरज आहे. आपण प्रार्थना करायला हवी. प्रार्थना करणं थांबवलं नाही पाहिजे' असं हिनाने म्हटलं आहे.
9 / 10
हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा भागाला घेरले असून तिथे जोरदार मारा करण्यात येत आहे. या संघर्षामुळे गाझातील लाखो रहिवाशांना अन्नधान्य, औषधे तसेच पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. त्या भागातील पिण्याचे पाणी, वीजदेखील तोडण्यात आली आहे
10 / 10
टॅग्स :हिना खानइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षइस्रायल - हमास युद्ध