Join us  

Hina Khan : "काहीही खाऊ शकत नाही"; ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानला आणखी एक नवा आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 10:57 AM

1 / 10
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे. सध्या तिची केमोथेरपी सुरू आहे. त्याचबरोबर हिना तिच्या उपचाराबाबतचे प्रत्येक अपडेट फॅन्ससोबत शेअर करत आहे.
2 / 10
या सर्व परिस्थितीमध्ये अभिनेत्रीच्या एका लेटेस्ट पोस्टने चाहत्यांना दु:खी केलं आहे. हिनाने पोस्टमध्ये सांगितले आहे की, केमोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे तिला आणखी एक नवीन आजार झाला आहे.
3 / 10
हिना खान स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे खुलासा केला आहे की, केमोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे तिला म्यूकोसायटिसचा त्रास होत आहे.
4 / 10
हिनाने पोस्टमध्ये लिहिलं की, 'केमोथेरपीचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे म्यूकोसायटिस. मात्र, त्याच्या उपचारासाठी मी डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करत आहे. तुमच्यापैकी कोणाला यातून गेले असेल किंवा काही उपयुक्त उपाय माहित असेल तर कृपया सल्ला द्या.'
5 / 10
'आपण खाऊ शकत नाही तेव्हा हे खरोखर कठीण आहे. तुमच्या सल्ल्यामुळे मला खूप मदत होईल.' अभिनेत्रीच्या पोस्टनंतर अनेक चाहते सल्ले देत आहेत आणि तिच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
6 / 10
एका चाहत्याने लिहिलं, 'तू लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करतो. हिनाने नुकतेच इन्स्टाग्रामवर हेल्थ अपडेट शेअर केले होते आणि सांगितले होते की तिने केमोथेरपीची पाच सेशन्स पूर्ण केले आहेत, तर अजून तीन सेशन्स बाकी आहेत.
7 / 10
हिनाने तिच्या फॉलोअर्सना सांगितले होते की, 'मला माहित आहे की मी कधी कधी गायब होते आणि मी कुठे आहे आणि मी कशी आहे याची तुम्हा सर्वांना काळजी वाटते. पण मी ठीक आहे. मी माझे पाचवे केमो इन्फ्युजन पूर्ण केलं आहे, आणखी तीन केमो इन्फ्युजन बाकी आहेत.'
8 / 10
'काही दिवस खूप कठीण आहेत, जसे की आजचा दिवस चांगला आहे आणि मला चांगले वाटते. कधीकधी गायब होणे ठीक आहे कारण मला बरे होण्यासाठी वेळ हवा आहे. बाकी सर्व काही चांगले आहे, तुम्ही सर्वजण प्रार्थना करत राहा.'
9 / 10
'हा एक टप्पा आहे, तो पास होईल, तो पार करावा लागेल आणि मी ठीक आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. आणि मी लढत आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा आणि माझ्यावर भरपूर प्रेम करा.'
10 / 10
टॅग्स :हिना खानटिव्ही कलाकारटेलिव्हिजनकर्करोग