"तू खरंच देवाचा आशीर्वाद...", हिना खानने पोस्ट शेअर करत बॉयफ्रेंडचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 12:42 IST
1 / 8अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंद देत आहे. या कठीण प्रसंगात ती जमेल तितकं सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. तसंच तिला यामध्ये कुटुंब, मित्रपरिवाराची साथ मिळत आहे.2 / 8हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल तिच्यामागे खंबीरपणे उभा आहे. तो सावलीसारखा तिच्यासोबत चालत आहे. हिनाने नुकतीच पोस्ट शेअर करत रॉकीचे आभार मानलेत. तसंच त्यांचे काही फोटोही तिने शेअर केलेत.3 / 8हिना हॉस्पिटलमध्ये असताना रॉकी पूर्ण वेळ तिची काळजी घेत आहे. तिला जेवण भरवत आहे. तिची सेवा करताना दिसत आहे.4 / 8आणखी एका फोटोत हिना खुर्चीवर अस्वस्थ बसली आहे. तर रॉकी तिचे पाय चेपताना दिसत आहे. जमेल तितका तिला आराम देण्याचा प्रयत्न करत आहे.5 / 8कॅन्सरच्या प्रवासात हिनाचे केसही गेले. हिनाला याचं फार दु:ख होऊ नये म्हणून रॉकीनेही तिच्यासोबत डोक्यावरचे सगळे केस काढले होते. 6 / 8हिना लिहिते, 'ज्या दिवशीपासून किमाथेरपी सुरु झाली तेव्हापासून रॉकी माझ्यासोबत गाईडसारखा उभा आहे. शरीर स्वच्छ करण्यापासून ते कपडे घालण्यापर्यंत सगळं तो करतो. तो माझ्याभोवती घेर करु उभा राहिला आहे.'7 / 8'आपण हसलो, रडलो, पडलो मी अनेकदा तुला दु:ख दिलं. पण तितकंच आपण एकमेकांचे अश्रुही पुसले. डॉक्टर तर नेहमीच बोलतात पण आज मीही बोलते की तू खरंच देवाचा आशीर्वाद आहेस.'8 / 8हिना आणि रॉकी मालदीव व्हॅकेशनवरही गेले होते. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्येही रॉकी हिनाला जमेल तितकं खास ट्रीट करत आहे जेणेकरुन ती मानसिकरित्या स्ट्राँग राहील. त्यांचे हे फोटोच त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहेत.