हितेन तेजवानी आणि गौरी प्रधानचे रोमँटिक फोटो तुम्ही पाहिले का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 4:25 PM1 / 7हितेन तेजवानीचा नुकताच वाढदिवस झाला असून त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची पत्नी गौरी प्रधानसोबत काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2 / 7हितेन आणि गौरीची पहिली ओळख एका जाहिरातीच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने झाली होती. 3 / 7गौरी आणि हितेनने कुटुंब, क्योंकी साँस भी कभी बहू थी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. 4 / 7हितेन हा प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच बिग बॉसमध्ये देखील तो झळकला होता. 5 / 7गौरीसोबत लग्न व्हायच्याआधी हितेनचे लग्न झालेले होते. पण लग्नाच्या काहीच महिन्यात त्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता. गौरीला पाहाताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. 6 / 7हितेन सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या कुटुंबियांचे अनेक फोटो आपल्याला त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पाहायला मिळतात. 7 / 7गौरी आणि हितेन यांना दोन मुलं असून त्यांच्या मुलांची नावं निवान आणि कात्या अशी आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications