Join us

‘Anupama’च्या एका एपिसोडसाठी रूपाली गांगुलीला किती मानधन मिळतं माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 4:00 PM

1 / 8
‘अनुपमा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल ठरत आलीये. अभिनेत्री रूपाली गांगुली ही या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय.
2 / 8
अनुपमा या गृहिणीच्या भूमिकेसाठी रूपाली गांगुली ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. मालिका चालतेय आणि यासोबतच रूपालीच्या मानधनातही वाढ झाल्याची चर्चा आहे.
3 / 8
होय, रुपालीला या मालिकेसाठी सर्वाधिक मानधन मिळत आहे. टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, अनुपमाची भूमिका साकारणाºया रूपालीला सुशांधू पांडे व गौरव खन्नापेक्षा अधिक मानधन मिळतं.
4 / 8
वृत्तानुसार, रुपालीला मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास 60 हजार रुपये मानधन मिळतं. छोट्या पडद्यावरील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत हे मानधन सर्वाधिक आहे.
5 / 8
टेलिव्हिजनवरील इतर लोकप्रिय अभिनेत्रींचं मानधन हे प्रत्येक एपिसोडसाठी 30 ते 35 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. वनराजची भूमिका साकारणाºया सुधांशु पांडेला प्रत्येक एपिसोडसाठी 50 हजार रूपये मानधन मिळतं.
6 / 8
गौरव खन्ना हा मालिकेत अनुज कपाडिया ही भूमिका साकारतोय. त्याच्या फीबद्दल निश्चित माहिती नाही. पण त्याचे मानधन 40 ते 45 हजार रूपये प्रति एपिसोड असल्याचं सांगण्यात येतेय. तुम्हाला ठाऊक असेलच की स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका ‘अनुपमा’चं मराठी रुपांतर आहे.
7 / 8
पहिल्या चार वर्षात रुपाली गांगुलीने पाच मालिकांमध्ये काम केले. मात्र यापैकी एकही मालिका सहा महिने देखील चालली नाही. दरम्यान साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली आणि तिच्या करियरला कलाटणी मिळाली.
8 / 8
रुपाली गांगुलीने २००० साली सुकन्या या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने दिल है की मानता नही, जिंदगी तेरी मेरी कहानी, भाभी, काव्यांजली या मालिकांमध्ये काम केले. मात्र यातील एकही मालिका फारशी कमाल दाखवू शकली नाही. त्यामुळे रुपालीवर फ्लॉप अभिनेत्रीचा टॅग लागला गेला. तिला कामही मिळणे बंद झाले होते. त्याच काळात तिने संजीवनी या मालिकेत काम केले. ही मालिका सुपरहिट ठरली पण यात रुपाली सहाय्यक भूमिकेत होती.
टॅग्स :टेलिव्हिजनस्टार प्लस