Join us

'हम पांच'मधील 'स्वीटी' कुठेय? रवीना टंडनच्या भावाशी लग्न, आता घटस्फोटानंतर जगतंय असं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 2:21 PM

1 / 8
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री राखी विजान (Rakhi Vijan)आजही 1995 मध्ये आलेल्या 'हम पांच' या टीव्ही शोसाठी ओळखली जाते. या शोमध्ये तिने स्वीटी माथूरची भूमिका साकारली होती, मात्र तिने तिच्या करिअरची सुरुवात 'देख भाई देख' या टीव्ही शोमधून केली होती. ( Photo Instagram)
2 / 8
'हम पांच'नंतर राखीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. देख भाई देख, बनेगी अपनी बात, बात बन जाए, सिनसिनाटी बबलाबू, हिना, हेरा फेरी, प्रोफेसर प्यारेलाल, जस्सी जैसी कोई नहीं, नागीन 4 अशा हिट मालिकांमध्ये तिने काम केलंय. ( Photo Instagram)
3 / 8
छोट्या पडद्याशिवाय मोठ्या पडद्यावरही ती झळकली. क्रिश 3, मनी है तो हनी है, गोलमाल रिटर्न्स, थँक्यू, सदियां, हमको इश्क ने मारा अशा अनेक चित्रपटांत तिने भूमिका साकारल्या.( Photo Instagram)
4 / 8
राखी विजानची प्रोफेशनल लाईफ यशस्वी ठरली. पण पर्सनल लाईफमध्ये तिने अनेक चढऊतार पाहिलेत. वैवाहिक आयुष्यात ती फार यशस्वी ठरली नाही.( Photo Instagram)
5 / 8
2004 मध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा भाऊ राजीव टंडनसोबत लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फक्त 6 वर्ष चाललं. 2010 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.( Photo Instagram)
6 / 8
घटस्फोटानंतर तिची पडद्यावरची सक्रियता कमी होऊ लागली. यानंतर गेल्या वर्षी तिने दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले की, 'मी खूप दिवसांपासून काम करत आहे, पण रोज नाही. मला आईसोबत वेळ घालवायला आवडतो. मी वयाच्या 14 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली आणि काही वर्षांपूर्वी मला समजले की मी माझ्या कुटुंबाला वेळ देत नाही.(Photo Instagram)
7 / 8
तिच्या तुटलेल्या लग्नाबद्दल बोलताना राखी म्हणाली, 'जेव्हा माझे लग्न मोडले होते, तेव्हा माझी स्थिती फारशी चांगली नव्हती. मला परत येण्यासाठी वेळ हवा होता. कोणत्याही प्रकारचे ब्रेकअप सोप नसते. घटस्फोटानंतर ती राजीव टंडनच्या संपर्कात नसल्याचेही तिनं सांगितले होते. (Photo Instagram)
8 / 8
राखी सध्या सिंगल आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण ती आनंदात जगते. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ( Photo Instagram)
टॅग्स :टिव्ही कलाकाररवीना टंडन