Join us  

आयुष्यभर साथ देण्याचं दिलेलं वचन; ४ वर्षांनंतर अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप?, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 4:50 PM

1 / 8
अभिनेत्री जॅस्मिन भसीन तिच्या 'अरदास' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट १३ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
2 / 8
जॅस्मिन आणि तिचा बॉयफ्रेंड अली गोनीचं ब्रेकअप झाल्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, तिचं आणि अलीचं ब्रेकअप झालं नसल्याचं अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्पष्ट केलं आहे.
3 / 8
या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी ती पुन्हा एकदा ब्रेकअपच्या अफवांमुळे चर्चेत आली होती. यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया देत 'हे सर्व बकवास' असल्याचं म्हटलं आहे.
4 / 8
कॅमेऱ्यासमोर अभिनेत्रीने हे म्हटल्यानंतर चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान अली आणि जॅस्मिनही डिनर एन्जॉय करताना दिसले.
5 / 8
जॅस्मिन आणि अलीची जोडी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे, त्यांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांना आनंद होतो.
6 / 8
रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी अली आणि जॅस्मिन अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. या दोघांचे असंख्य चाहते आहेत.
7 / 8
बिग बॉस १४ मध्ये दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. ते नेहमीच एकत्र दिसत असतात. त्यामुळे आता हे दोघं ऑफिशिअली नेमकं कधी लग्न करणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
8 / 8
टॅग्स :जास्मीन भसीन