लग्नाच्या 2 वर्षांतच मोडला संसार, बिपाशा बासूच्या पतीनं दिला धोका, आता सिंगल आयुष्य एन्जॉय करतेय अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:31 AM1 / 8खूप कमी वयात या अभिनेत्रीने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. यानंतर तिचं मनोरंजन जगतात खूप मोठ नाव झालं. आजही तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. (फोटो इन्स्टाग्राम) 2 / 8या फोटो पाहून तुम्ही तिला ओळखलंच असेल. आम्ही बोलतोय ते प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेटबद्दल. जेनिफरचा जन्म ३० मे १९८५मध्ये मुंबईत झाला. जेनिफरन २००२मध्ये आलेल्या लहान मुलांचा कार्यक्रम 'शाका लाका बूम बूम'मुळे प्रकाशझोतात आली.3 / 8जेनिफरने 2009 मध्ये 'दिल मिल गए'मध्ये दिसली होती. यानंतर तिने संजय लीला भन्साळींच्या 'सरस्वतीचंद्र' या शोमध्ये 'कुमुद' ही व्यक्तिरेखा साकारली आणि तिला खूप पसंती मिळाली. जेनिफर हे टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव बनले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 8यानंतर जेनिफरने 'बेहद' आणि 'बेपन्ना' सारख्या शोमधून खूप प्रसिद्धी मिळवली आणि अनेक पुरस्कारही जिंकले. अलीकडेच ती 'कोड एम' या वेबसीरिजमध्ये दिसली. यामध्ये त्यांनी 'मेजर मोनिका मेहरा'ची भूमिका साकारली होती. आज जेनिफर तिचा वाढदिवस साजर करते आहे. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 8पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हरमध्ये एकत्र काम करताना जवळीक निर्माण झाली होती आणि दोघांनी 2012 मध्ये लग्न केले होते. पण 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर करणने बिपाशा बसूसोबत लग्न केलं. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 8रिपोर्ट्सनुसार, बिपाशा बसूमुळे करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेटचे लग्न मोडले असल्याचे म्हटले जात आहे. खरंतर करण त्यावेळी बिपाशासोबत 'अलोन' चित्रपटात काम करत होता. त्याचवेळी दोघांची नावे एकमेकांशी जोडली जात होती. करणने नंतर जेनिफरला घटस्फोट दिला आणि बिपाशा बसूशी लग्न केले. बिपाशा आणि करण आता एका मुलीचे पालक झाले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)7 / 8करणसोबत घटस्फोट झाल्यानंतर जेनिफर डिप्रेशनमध्ये गेली होती. यातून सावरायला त्याला बराच वेळ लागला. यानंतर तिने स्वत:ला बिझी करुन घेतलं. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 8आज जेनिफर टीव्ही जगतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती तिचं सिंगल लाईफ एन्जॉय करतेय.(फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications