'लिटिल चॅम्प' च्या जन्मानंतर ग्लॅमरस लूकमध्ये दिसली कार्तिकी; बाळाचा फोटो कधी दाखवणार? म्हणाली... By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 1:48 PM1 / 7'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स फेम कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) आता एका मुलाची आई आहे. कार्तिकीने २३ व्या वर्षीच लग्न केलं आणि चार वर्षांनी तिला बाळही झालं. 2 / 7लेकाच्या जन्मानंतर कार्तिकी नवऱ्यासोबत फिरायला गेली आहे. तिने तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. यात तिचा ग्लो पाहून अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.3 / 7प्रिंटेड टॉप, मरुन रंगाची पँट, गॉगल असा तिचा लूक आहे. या किलर लूकमध्ये तिने पोज देत फोटोसेशन केले आहे. ती एका मुलाची आई आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही.4 / 7तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. 'सुंदर फोटो. तू ग्लो करत आहेस','प्रेग्नंसीनंतर तू आणखी ग्लोईंग दिसत आहेस' अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.5 / 7कार्तिकीचे हे फोटो नक्की कोणत्या ठिकाणचे आहेत हे तिने लिहिलेलं नाही. पूलसाईडला तिने काढलेल्या फोटोंची तर बातच और आहे. 6 / 7कार्तिकीने अद्याप तिच्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. अनेक चाहत्यांनी तिला बाळाचा फोटोही दाखवा अशी विनंती केली आहे. यावर कार्तिकीने 'लवकरच' अशी कमेंट करत त्यांना आश्वासन दिलं आहे. 7 / 7कार्तिकीच्या नवऱ्याचं नाव रोनित पिसे आहे. तो तिच्यासारखा गायक नाही तर शेअर मार्केटमध्ये आहे. तो ट्रेडिंगच्या जगातला मास्टर आहे. गुंतवणूकीसंदर्भात तो मार्गदर्शन करत असतो. त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो ट्रेडिंग करत असून नवीन लोकांना याचे धडेही देत आहे. - फोटो सौजन्य (Kartiki kalyanji Gaikwad Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications