Join us

१० वर्षांनी लहान अभिनेत्याशी लग्न, १४ वेळा झाला गर्भपात; सरोगसीद्वारे अभिनेत्री झाली २ मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 5:34 PM

1 / 8
अभिनेत्री कश्मीरा शाह आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक हे सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहेत. २०१२ साली कश्मीरा आणि कृष्णा यांनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली होती.
2 / 8
कश्मीरा आणि कृष्णा अभिषेक यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात वन नाईट स्टँडपासून झाली होती. डिनर डेटसाठी गेलेले कश्मीरा-कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले.
3 / 8
नंतर काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता.
4 / 8
कश्मीरा आणि कृष्णा यांच्यात १० वर्षांचं अंतर आहे. कश्मीरा शाह ही कृष्णापेक्षा १० वर्षांनी लहान आहे.
5 / 8
लग्नानंतर प्रयत्न करूनही कश्मीराला मूल होत नव्हतं. तब्बल १४ वेळा प्रयत्न करूनही मुल होत नसल्याचा खुलासा कश्मीराने केला होता.
6 / 8
इतक्या वेळा गर्भपात झाल्यानंतर कश्मीराने IVF ची मदतही घेतली होती. मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही.
7 / 8
शेवटी त्यांनी सरोगसीच्या मदतीने आईबाबा होण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून कश्मीरा आणि कृष्णा जुळ्या मुलांचे आईबाबा झाले.
8 / 8
रायान आणि क्रिशांग अशी कृष्णा आणि कश्मीराच्या मुलांची नावे आहेत.
टॅग्स :कृष्णा अभिषेकसेलिब्रिटीटिव्ही कलाकार