Join us

Raju Srivastav : राजू श्रीवास्तव यांची लेक अंतराने ‘या’ चित्रपटात केलंय काम, मिळालाय राष्ट्रीय शौर्य पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:07 IST

1 / 9
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या 9 दिवसांपासून ते रूग्णालयात आहेत. त्यांचे कुटुंबीय हवालदिल झालं आहे. यात राजू श्रीवास्तव यांची लेक अंतरा श्रीवास्तव हिचाही समावेश आहे.
2 / 9
अंतरा रोज पापाच्या प्रकृतीबद्दल माहिती देत आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन करत आहे. माझे पप्पा लवकर बरे होतील, असा विश्वास तिला आहे.
3 / 9
राजू श्रीवास्तव यांची लेक अंतरा ही सुद्धा फिल्म इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहे. अ‍ॅक्टिंगपासून अनेक प्रोड्यूसर, डायरेक्टरसोबत तिने काम केलं आहे.
4 / 9
रिपोर्टनुसार, अंतरा 28 वर्षांची आहे. तिचं अद्याप लग्न झालेलं नाही. मुंबईच्या ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलमधून तिचे शालेय शिक्षण झालं. यानंतर मुंबईच्या एचआर कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्समधून तिने मास मीडिया इन अ‍ॅडव्हरटायजिंगची पदवी घेतली.
5 / 9
2006 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते तिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. तिने घरात शिरलेल्या दोन चोरांपासून आपल्या आईला वाचवलं होतं.
6 / 9
या घटनेबद्दल अंतराने एका मुलाखतीत सांगितलं होतं, त्या चोरांजवळ बंदूक होती. मी आईला त्यांच्यापासून वाचवलं. मी बेडरूममध्ये गेले आणि पप्पा व पोलिसांना मदत मागितली. नंतर खिडकीतून बिल्डिंगच्या चौकीदाराला आवाज दिला. चौकीदार व पोलिसांनी माझ्या आईला चोरांपासून वाचवलं.
7 / 9
अंतराने 2013 साली फ्लाइंग ड्रीम एंटरटेनमेंटमध्ये असिस्टंट प्रोड्यूसर व डायरेक्टर म्हणून काम करायला सुरूवात केली. मॅक प्रॉडक्शनसाठीही तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं.
8 / 9
असिस्टंट प्रोड्यूसर व डायरेक्टर म्हणून तिने फुल्लू, पलटन, द जॉब, पटाखा, स्पीड डायल अशा अनेक चित्रपटांसाठी काम केलं.
9 / 9
अंतराने 2018 साली ‘वोडका डायरिज’मधून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला. यात तिने काव्याची भूमिका साकारली होती. तिला भटकंती खूप आवडते. ती सोशल मीडियावर ब-यापैकी अ‍ॅक्टिव्ह आहे.
टॅग्स :राजू श्रीवास्तव