तीन दिवसांचं शूट आणि ३३ कलाकारांची फौज, 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत रंगला संगीतसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:10 IST
1 / 7'ठरलं तर मग' आणि 'लग्नानंतर होईलच प्रेम' या दोन मालिकांचा महासंगीत सोहळा सलग तीन तास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत2 / 7 तीन तासांच्या या महासंगीत सोहळ्यात ३३ कलाकारांची फौज दिसणार आहे. अर्जुन, सायली, नंदिनी, पार्थ, जीवा आणि काव्यासह दोन्ही मालिकेतील सर्व मुख्य कलाकार या महासंगीत सोहळ्यात दिसणार आहेत. 3 / 7तीन तासांचा हा अभूतपूर्व सोहळा साकारण्यासाठी १५० पेक्षा जास्त तंज्ञत्र मंडळी तीन दिवस मेहनत घेत होते. 4 / 7अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि अभिनेते विजय आंदळकर यांची संगीतसोहळ्यातील रोमँटिक केमिस्ट्री सर्वांचं लक्ष वेधून घेतेय5 / 7या दोघांनी नेमक्या कोणत्या गाण्यावर डान्स केलाय हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेच्या निमित्ताने मृणाल दुसानीसने अनेक वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक केलंय6 / 7९ फेब्रुवारीला 'ठरलं तर मग' आणि 'लग्नानंतर होईल प्रेम' मालिकांचा महासंगीत सोहळा सायंकाळी ७ वाजल्यापासून स्टार प्रवाहवर पाहता येईल7 / 7सलग तीन दिवस महासंगीत सोहळ्याचं शूटिंग सुरु होतं. सेटवर सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडाव्यात यासाठी निर्माते सोहम आणि सुचित्रा आदेश बांदेकर आवर्जून उपस्थित होते.