द्रोपदीच्या वस्त्रहरण सीनच्या वेळी सेटवर लागली आग, दैवी शक्तीचाही झाला भास! 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा अनुभव By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 4:30 PM1 / 8२०१३ साली टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'महाभारत' मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. 2 / 8सौरभ जैन, पूजा शर्मा, शाहीर शेख, अहम शर्मा, पुनीत भट, अंकित मोहन अशी या मालिकेची स्टारकास्ट होती. या मालिकेत पूजाने द्रोपदीची भूमिका साकारली होती. 3 / 8नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पूजाने मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान आलेले काही प्रसंग सांगितले. 4 / 8द्रोपदीच्या वस्त्रहरणाचा सीन सुरू होता त्यावेळेस सेटवर दोनदा आग लागल्याचं तिने सांगितलं. 5 / 8'सेटवर एक जागा होती जिथून द्रोपदीची साडी दाखवायची होती. तिथे एक ट्रान्सफॉर्मर ठेवण्यात आलं होतं. ज्याला दोन वेळा आग लागली होती'. 6 / 8'हा फारच भावनिक सीन होता. त्यामुळे सेटवरही तणाव जाणवत होता. सीन शूट करताना कृष्ण साकारणाऱ्या अभिनेत्याने कॅमेराकडे बघताच एक घटना घडली'. 7 / 8'ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन विस्फोट झाले आणि आग लागली. मला तिथे दैवी शक्ती असल्याचाही भास झाला', असं अभिनेत्रीने सांगितलं. 8 / 8'महाभारत मालिकेच्या शूटिंगमध्ये मी कधीच असं पाहिलं नव्हतं. मला कधीच असं जाणवलंही नव्हतं'. आणखी वाचा Subscribe to Notifications