Join us

जे बात! ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ मॉडेल झाला...! गौरव मोरेनं कॅलेंडरसाठी केलं पहिलं वहिलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 5:56 PM

1 / 10
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एक हरहुन्नरी कलाकार आणि ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणजे गौरव मोरे. सध्या गौऱ्या म्हणजे चाहत्यांचा लाडका कलाकार. त्याच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत.
2 / 10
तुमचा आमचा लाडका हाच गौऱ्या आता मॉडेल बनला आहे. होय, गौरवने नुकतंच एका कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं. या कॅलेंडरचं प्रकाशन नुकतंच पार पडलं.
3 / 10
गौरवने सोशल मीडियावर त्याची माहिती दिली. माझं पहिलं वहिलं कॅलेंडर लॉन्च,विश्वास बसत नाही, असं म्हणत फोटोशूटचा एक फोटो त्याने शेअर केला आहे.
4 / 10
पवई फिल्टरपाडामध्ये राहणाऱ्या गौरवने अनेक एकांकिका स्पर्धा, युथ फेस्टिवल त्याने गाजवले. हे सगळं करत असताना ‘जळू बाई हळू’ या नाटकात अभिनेता आनंदा कारेकरचा बदली कलाकार म्हणून तो काम करत होता.
5 / 10
‘जळू बाई हळू’ या नाटकात काम सुरू असतानाच प्रसाद खांडेकर यांच्या ‘पडद्याआड‘ या एकांकिकेसाठी गौरव काम करू लागला आणि याच एकांकिकेमुळे त्याला नवी ओळख मिळाली.
6 / 10
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून त्यानं मालिकाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तो विनोदी भूमिका करत होता.
7 / 10
मराठी चित्रपट आणि मालिकेतील त्याचं काम पाहून हिंदी चित्रपटसृष्टीतही त्याला संधी मिळाली. संजू, कामयाब, झोया फॅक्टर या चित्रपटातील त्याच्या कामाची चांगली वाहवा झाली.
8 / 10
महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमात गौरव मोरेच्या एण्ट्रीला एक विशिष्ट्य प्रकारचं म्युझिक वाजवलं जातं.अन् त्यानंतर फिल्टर पाड्याचा बच्चन अशी त्याची ओळख करुन दिली जाते. आता हे फिल्टर पाडा म्हणजे नेमकं आहे तरी काय?
9 / 10
तर फिल्टर पाडा ही आरे कॉलनीमधील एक जागा आहे. सभोवताली जंगल आणि त्यामध्ये एक लहानशी वस्ती असं या जागेचं स्वरुप आहे. याच भागात गौरवचं बालपण गेलं. त्यामुळं त्याला फिल्टर पाड्याचा बच्चन असं म्हणतात.
10 / 10
अमिताभ बच्चन हे गौरवचे आवडते अभिनेते आहेत. त्याला बिग बींची ‘हम’ चित्रपटातील स्टाईल मारायला खूप आवडते. त्याची ही एण्ट्रीची शैली हास्य जत्रेच्या लेखकांना प्रचंड आवडली. त्यामुळं त्याला त्याच शैलीत त्यांनी एण्ट्री मारण्यास सांगितली आणि तो फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून लोकप्रिय झाला.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार