PHOTOS: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची परफेक्ट फॅमिली, हटके आहे लव्हस्टोरी! By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 8:00 AM1 / 11‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शो. या शोमधील विनोदवीरांची चर्चा नेहमीच होत असते. या कार्यक्रमातील असाच एक विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर.2 / 11होय, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी प्रसाद खांडेकरची ओळख आहे. हिंदी आणि गुजराती रंभभूमीवरही त्याने लेखक दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटविला आहे.3 / 11 कित्येक वर्षांपासून प्रसाद चाहत्यांचं मनोरंजन करतोय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो घराघरात लोकप्रिय झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या प्रसादच्या चेहऱ्यावर कुणाला पाहिल्यावर लगेच स्माईल येतं. तर पत्नी अल्पा आणि मुलगा श्लोक.4 / 11होय, प्रसादच्या पत्नीचं नाव अल्पा आहे. प्रसाद आणि अल्पा यांचं लव्हमॅरेज. दोघांनाही श्लोक नावाचा एक गोंडस मुलगा आहे.5 / 11प्रसादची बायको अल्पा ही सुद्धा अभिनेत्री असून तिने अनेक नाटकांत व एकांकिकेत काम केलंय. लग्नाआधी 8 वर्ष अल्पा व प्रसाद एकमेकांच्या प्रेमात होते.6 / 11दोघांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती. प्रसाद तेव्हा कॉलेजच्या नाटकाच्या ग्रूपमध्ये होता. त्यावेळी अल्पाला तो टवाळकी करणारा मुलगा वाटायचा.7 / 11पण नंतर अल्पाने स्वत: नाटकात काम करणं सुरू केलं आणि एक नाटक उभं करण्यासाठी किती मेहनत लागते हे तिला कळलं आणि यानंतर तिच्या मनात प्रसादबद्दल आदर निर्माण झाला.8 / 11यानंतर प्रसाद व अल्पा एकाच नाटकात नवरा बायको म्हणून झळकले. यानंतर दोघांनी अनेक नाटकांत एकत्र काम केलं आणि प्रसाद अल्पाच्या प्रेमात पडला.9 / 11एका नाटक स्पर्धेतून घरी परतत असताना प्रसादने अल्पाला घरी पोहोचल्यावर कॉल कर असं म्हटलं. अल्पाकडे फोन नव्हता. तिने पीसीओवरून प्रसादला फोन केला.10 / 11आणि पलीकडून प्रसादने त्याच्या मनातील सर्व भावना अल्पाला सांगितल्या. मी तुझ्यात गुंतत चाललो आहे, मला तू आवडतेस, असं तो म्हणाला. अल्पाला तर काय बोलावं हेच सुचेना. त्यानंतर दोन दिवसांनी अल्पाने प्रसादला होकार दिला आणि तब्बल 8 वर्षांनी घरच्यांच्या परवानगीनं लग्नगाठ बांधली. 11 / 11प्रसाद सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. आपल्या पत्नी व मुलासोबतचे फोटो तो सतत शेअर करत असतो. प्रसाद एक परफेक्ट फॅमिली मॅन आहे. हे त्याच्या फॅमिलीचे फोटो पाहिल्यावर लक्षात येतं. आणखी वाचा Subscribe to Notifications