Join us  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने शेअर केले पूलमधील फोटो, नेटकरी म्हणाले- "असे फोटो टाकतोस म्हणून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 1:29 PM

1 / 9
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली.
2 / 9
या संधीचं सोनं करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता ओंकार राऊत. अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेल्या ओंकारला हास्यजत्रेमुळे नवी ओळख मिळाली.
3 / 9
ओंकार सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो.
4 / 9
नुकतंच ओंकारने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्विमिंगपूलमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने 'POOL मधे मला PUSH केल्यावर हे होतं', असं कॅप्शन दिलं आहे.
5 / 9
ओंकारच्या या फोटोंवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
6 / 9
'भावा असले फोटो टाकतो म्हणून प्राजू रिप्लाय देत नाही', 'अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन...तुला फ्रेशर्स आणि टाइमपासमध्ये पाहिलं होतं', अशा कमेंट्स केल्या आहेत.
7 / 9
'गरमी फार वाढली आहे ना? हे वयच असे असते...Enjoy the chil...', 'PP ने क्लिक केला असेल हा फोटो', 'पानी मे आग लगा दी', अशाही कमेंट्स आहेत.
8 / 9
ओंकारचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे.
9 / 9
ओंकारने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'फ्रेशर्स' या मालिकेत तो दिसला होता. 'टाइमपास', 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या सिनेमांमध्येही तो झळकला आहे.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता