Join us  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची दुबईवारी! फोटो पाहून नेटकरी म्हणाले- "शालू कुठे आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 9:37 AM

1 / 9
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेला कार्यक्रम आहे. अनेक कलाकारांना या शोमुळे लोकप्रियता मिळाली.
2 / 9
उत्तम अभिनय आणि कमालीची विनोदबुद्धी असलेले प्रभाकर मोरे यांनाही हास्यजत्रेमुळेच लोकप्रियता मिळाली.
3 / 9
कामातून वेळ काढत प्रभाकर मोरे सध्या दुबईला फिरायला गेले आहेत. याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
4 / 9
प्रभाकर मोरेंनी दुबईतील फोटो शेअर करत 'हबिबी कम टू दुबई' असं कॅप्शन दिलं आहे.
5 / 9
दुबईतील बुर्ज खलिफालादेखील मोरेंनी भेट दिली. याचाही फोटो त्यांनी शेअर केला आहे.
6 / 9
प्रभाकर मोरेंच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
7 / 9
'दुबईला शालू झालीच पाहिजे', 'काय समजलिव...' असं काहींनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.
8 / 9
तर 'कातील प्रभाकर मोरे', 'आता वातावरण कातिल होईल', 'शालू कुठे आहे', 'वाह दादा' अशा कमेंट्सही केल्या आहेत.
9 / 9
प्रभाकर मोरेंचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता