Join us

इंडस्ट्रीत येण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने बदललं नाव, म्हणाली- "लंडनमध्ये असताना..."

By कोमल खांबे | Updated: March 12, 2025 11:57 IST

1 / 10
सिनेइंडस्ट्रत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत येण्यासाठी स्वत:च नाव बदललं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीनेदेखील इंडस्ट्रीत येण्याअगोदर स्वत:च्या नावात बदल केला.
2 / 10
हास्यजत्रेतील ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ईशा डे आहे. ईशाने इंडस्ट्रीत येण्याआधी तिच्या नावात मोठा बदल केला.
3 / 10
ईशाने लंडन स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. तिथे ऑडिशनदरम्यानचा किस्सा सांगताना ईशाने नाव बदलल्याचा खुलासा आनंद नाडकर्णी यांना दिलेल्या मुलाखतीत केला होता.
4 / 10
'माझं खरं नाव ईशा वडनेरकर आहे. मी लंडन स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत होते. तिथे स्टेज नेम, स्क्रिन नेम घेण्याची पद्धत आहे'.
5 / 10
'माझा कोर्स संपताना मी कास्टिंग ऑडिशनसाठी जायला लागले. तिथे वेळेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ऑडिशनसाठी फक्त १५ मिनिटांचा स्लॉट असतो'.
6 / 10
'मी ऑडिशनला गेल्यानंतर माझं नाव ते विचारायचं. मी ईशा वडनेरकर असं म्हटल्यानंतर ते मला आडनावाबद्दल विचारायचे. त्यांना जाणून घेण्यात उत्सुकता वाटायची. हे गमतीशीर संभाषण ५ मिनिटं चालू राहायचं आणि मग ऑडिशनला १० मिनिटचं मिळायची'.
7 / 10
'माझे जे ट्यूटर होते त्यांनी मला सांगितलं की इथे सगळे वेगळं नाव घेतात त्यामुळे तूदेखील घेऊ शकतेस. मग मी आईबाबांशी बोलले'.
8 / 10
'लहानपणापासूनच मी जे बोलेन त्याला त्यांनी सपोर्ट केला आहे. त्यामुळे त्यांना काहीच हरकत नव्हती. मग आम्ही एकत्र बसून वेगवेगळी आडनावं काढली'.
9 / 10
'मला सोपा शब्द हवा होता आणि त्यातून मी भारतीय असल्याचंही दाखवायचं होतं. मग अनेक नावांमधून ईशा डे हे नाव फायनल केलं. मला अजूनही वेस्टर्नमध्ये काम करण्याची इच्छा आहे'.
10 / 10
ईशाने मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. बॉबी देओलच्या 'आश्रम' वेब सीरिजमध्येही ती दिसली होती.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार