Join us  

"ओंकार भोजनेचं टी शर्ट", शिवाली परबच्या फोटोंनी वेधलं लक्ष, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 1:11 PM

1 / 8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोमधूनच अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली.
2 / 8
अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी शिवाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असते.
3 / 8
शिवालीने नुकतंच हटके फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
4 / 8
या फोटोंमध्ये शिवालीने शॉर्ट आणि टीशर्ट घालून राऊडी लूक केल्याचं दिसत आहे. फोटोसाठी तिने पोझही दिल्या आहेत.
5 / 8
शिवालीने फोटोत घातलेल्या टीशर्टवर 'ONKER 71' असं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
6 / 8
'फक्त थोडंसं नावाचं स्पेलिंग चुकलं आहे', 'अरे ओंकार भोजनेचा टीशर्ट' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
7 / 8
'ओंकारचं टीशर्ट घातलंस का?', अशी कमेंटही एका चाहत्याने शिवालीच्या या फोटोंवर केली आहे.
8 / 8
शिवालीने काही मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. प्रेम प्रथा धुमशान या सिनेमात शिवालीने मुख्य भूमिकाही साकारली होती.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार