कल्याणच्या चुलबुलीची लंडनवारी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने शेअर केले परदेश दौऱ्याचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 12:32 PM1 / 7'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील लोकप्रिय शो आहे. याच शोमधून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली. 2 / 7शिवाली हास्यजत्रेच्या टीमबरोबर लंडन दौऱ्यावर गेली होती. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. 3 / 7यामध्ये शिवालीने गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि टॉप परिधान केल्याचं दिसत आहे.4 / 7लंडनच्या रस्त्यांवर उभं राहून शिवालीने पोझ दिल्या आहेत. शिवालीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 5 / 7शिवाली तिच्या अभिनयाने आणि विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळवून हसवते. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. 6 / 7शिवाली सोशल मीडियावर सक्रिय असते. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. 7 / 7काही मालिका आणि सिनेमांमध्येही शिवालीने काम केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications