Join us  

बॉलिवूड अभिनेता नाही तर हा आपला निखिल बने! फोटो पाहून म्हणाल- "भावा विषय End"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 1:01 PM

1 / 8
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. याच संधीचं सोनं करून अभिनेता निखिल बने घराघरात पोहोचला.
2 / 8
उत्तम अभिनय आणि विनोदबुद्धीच्या जोरावर निखिलने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलं. बने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
3 / 8
त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स बने पोस्टद्वारे चाहत्यांना देत असतो. नुकतेच त्याने हटके फोटोशूट केलं आहे.
4 / 8
याचे फोटो निखिल बनेने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बनेचा रुबाबदार लूक पाहायला मिळत आहे.
5 / 8
जीन्स, टीशर्ट आणि त्यावर डिझायनर जॅकेट बनेने घातलं आहे. डोळ्यावर चष्मा आणि पायात शूज घालून बने राऊडी लूक केला आहे.
6 / 8
त्याचे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. बनेचा हा लूक एका बॉलिवूड अभिनेत्यासारखा वाटत आहे.
7 / 8
त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'विषय आता सुरू झालाय वेड्या', अशी कमेंट अभिनेत्री हेमांगी कवीने केली आहे.
8 / 8
'विषय हार्ड', 'पहिल्या फोटो बघितल्यावर वाटलं की निलेश साबळे...पण भावा एकदम भारी', 'बने आज भी दिन बने' अशा कमेंट्सही केल्या आहेत.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता