Join us

" हास्यजत्रेमुळे अनेक सिनेमे हातातून गेले", प्राजक्ताचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "सई, सोनाली किंवा हृतासारखं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 5:04 PM

1 / 9
प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण, तिचा एकही चित्रपट सुपरहिट ठरला नाही.
2 / 9
प्राजक्ताने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खंत व्यक्त केली. ती म्हणाली, ' मला पहिला चित्रपट पटकन मिळाला. त्यानंतर केदार शिंदेंची खो खो केला.'
3 / 9
'पण, सई ताम्हणकर, सोनाली, हृता यांच्या नावावर टायटल गेल्या असलेले चित्रपट आहेत. पण, माझ्यावर नावावर असा चित्रपट नाही. किंवा माझ्या नावावर 'सैराट', 'दुनियादारी'सारखा सुपरहिट सिनेमा नाही.'
4 / 9
'मला टेलिव्हिजन मध्ये स्ट्रगल करावा लागला नाही. माझे सगळ्या मालिका आणि शो हिट गेले. पण, चित्रपट हिट करण्यात स्ट्रगल करावा लागत आहे.'
5 / 9
'मी खूप वेळ टेलिव्हिजनचा चेहरा बनून राहिले. त्यामुळे कमर्शियल फिल्म वाट्याला आल्या नाहीत. माझे आधीचे चित्रपट न चालल्यामुळे दुसऱ्या चित्रपटांत वर्णी लागली नाही.'
6 / 9
'हास्यजत्रेमुळे मी वेळ नाही देऊ शकणार, असं काहींना वाटलं. त्यामुळेही हातातून सिनेमे गेले. हास्यजत्रेत आम्ही फार काळ शूटिंग करत नाही.'
7 / 9
'पण, त्याचं एक्पोजरच इतकं आहे की आम्ही खूप व्यग्र असल्याचं वाटतं. त्यामुळे हास्यजत्रेमुळे काही सिनेमे गेले आहेत. लंडनच्या अनेक फिल्म्स गेल्या. त्यांना वाटलं मी येऊच शकणार नाही, वेळ देऊ शकणार नाही.'
8 / 9
'पण, मला असं वाटतं की देवाने आत्तापर्यंत हे घडवलेलं नाही. यामागेही काहीतरी कारण आहे. कदाचित मी काहीतरी वेगळं करावं असं त्याला वाटत असावं,' असंही प्राजक्ताने सांगितलं.
9 / 9
प्राजक्ताने 'खो-खो', 'पावनखिंड', 'तांदळा', 'चंद्रमुखी', 'पांडू' अशा अनेक सिनेमांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
टॅग्स :प्राजक्ता माळीमहाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार