Join us

अनिरुद्धने प्रपोज केल्यावर रसिका वेंगुर्लेकरने दिला होता नकार, अशी फुलली दोघांची लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 5:58 PM

1 / 8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातील सगळेच कलाकार आज सेलिब्रिटी बनलेत.समीर चौघुले, वनिता खरात, नम्रता आवटे, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, रसिका वेंगुर्लेकर, ओंकार भोजने अशा अनेक कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
2 / 8
या सर्वांमध्ये एक अशी कलाकार आहे जिची लव्हस्टोरी खूपच चर्चेत आली होती ती कलाकार म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. रसिका वेंगुर्लेकर Rasika Vengurlekar) लोकप्रिय दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे (Aniruddha Shinde)यांच्याशी 2018 मध्ये लग्नगाठ बांधली
3 / 8
मुंबईतील परळच्या एमडी महाविद्यालयात रसिका आणि अनिरुद्ध यांची पहिली भेट झाली. महाविद्यालयात असल्यापासूनच दोघेही एकांकिकेत काम करत होते. 'एमडी नाट्यांगण' या एकांकिकेत दोघांची भूमिका होती.
4 / 8
तेव्हाच अनिरुद्ध रसिकाच्या प्रेमात पडला. यानंतर अनिरुद्धने रसिकाला प्रपोज करायचं ठरवलं त्यांनी चक्क बसस्टॉपवर रसिकाला मागणी घातली. तेव्हा रसिकाने मात्र त्याला नकार दिला होता.
5 / 8
पुढे काही वर्ष दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनिरुद्धने रसिकाला प्रपोज केलं तेव्हा ती फर्स्ट इयरला होती आणि तिला करिअर कडे लक्ष द्यायचं होतं. त्यामुळे दोघेही मित्रच राहिले.
6 / 8
अनिरुद्धसोबत रिलेशनशिप साठी रसिकाची तयारी नव्हती तिने होकार देऊ आणि पुढचं पुढे बघू असं ठरवलं. पण दरम्यान तीही अनिरुद्धच्या प्रेमात पडली दोघांनी दहा वर्ष एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.
7 / 8
करिअर बाबतीत अनिरुद्ध नेहमीच फोकस आणि प्रामाणिक होता. त्याने मलाही कायम पाठिंबा दिला. एखादी गोष्ट त्याने ठरवली की तो करून दाखवतोच. मी त्याच्यासोबत जगातली कुठलीही गोष्ट शेअर करू शकते त्यामुळे मी त्याला होकार दिला, असं रसिका म्हणाली होती.
8 / 8
अनिरुद्ध आणि रसिका यांचे सोशल मीडियावरील फोटो नेहमीच चर्चेत असतात या जोडगोळीचे अनेक चाहते आहे. रसिकाचा नवरा कलाविश्वाशी निगडीत आहे. तो प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. रसिकाच्या नवऱ्याने 'का रे दुरावा', 'फ्रेशर्स' सारख्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेतालग्नदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट