Join us

"१०४ डिग्री ताप, डोळे लाल झालेले अन्...", शिवालीने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली- हॉस्पिटलला नेलं तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 1:09 PM

1 / 10
कल्याणची चुलबुली अशी ओळख मिळवलेली शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रसद्धीझोतात आली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते.
2 / 10
याबरोबरच शिवालीने हास्यजत्रेचं शूट करताना घडलेला एक प्रसंगही सांगतिला. अंगात १०४ डिग्री ताप असताना शूट केल्याचा खुलासा शिवालीने केला.
3 / 10
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिवालीने कलाविश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली. संपूर्ण स्वराजला दिलेल्या मुलाखतीत शिवालीने तिच्या घरच्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं.
4 / 10
ती म्हणाली, 'मला नुकताच डेंग्यू झाला होता. तेव्हा मी पुणे, गडचिरोली, दिल्ली असा चार दिवसांचा प्रवास करुन हास्यजत्रेच्या शूटिंगसाठी आले होते.'
5 / 10
'दिल्लीवरुन आले तेव्हाच सकाळी मला ताप आला होता. अंग थरथरत होतं तरीदेखील मी शूटिंगसाठी गेले होते. संध्याकाळी मी घरी गेल्यानंतर डॉक्टरकडून औषध घेतलं. एक दिवस मला बरं वाटलं.'
6 / 10
'दुसऱ्या दिवशी पुन्हा ७ वाजता सेटवर शूटिंगसाठी गेले. मला १२ वाजताच्या दरम्यान थंडी भरायला लागली. मला माहीत नाही काय होतंय. सगळे मला बघायला आले होते.'
7 / 10
'समीरदादा बर्फाच्या पाण्याने अंग पुसत होता. नमाताई पाठ पुसत होती. डोक्यावर पट्ट्या घालत होते.'
8 / 10
'तेव्हा मला १०४ ताप होता. अंगात ताकद नव्हती, थरथरत होते. डोळे पाणावले होते. चार दिवसांनी एपिसोड लागणार होता. त्यामुळे मी सरांना म्हटलं की मी करेन.'
9 / 10
'अशा परिस्थितीत मी २० मिनिटांचं स्किट केलं. त्यानंतर चेंज केल्यानंतर प्रसाद दादाने मला लगेच हॉस्पिटलला नेलं. त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. हॉस्पिटलला गेल्यानंतर समजलं की मला डेंग्यू झाला होता.'
10 / 10
'पण, याचा स्किटवर काहीच परिणाम झाला नाही,' असंही पुढे शिवालीने सांगितलं.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार