मुर्हूत ठरला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात 'या' दिवशी बांधणार लग्नगाठ, डिटेल्स आले समोर By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 1:18 PM1 / 9सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात(Vanita Kharat) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 2 / 9अभिनेत्री वनिता खरात(Vanita Kharat)च्या लग्नाची तारीख समोर आली आहे. 3 / 9वनिता खरातने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहिररित्या प्रेमाची कबुली दिली होती. 4 / 9सुमित लोंढे असे वनिताच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. तिने लिहिले होते की, कुछ तूने सी है मैंने की हैं रफू….ये डोरियां …….हॅप्पी बर्थडे साथी. 5 / 9इतकेच नाही तर दिवाळीही या दोघांनी एकत्र साजरा केला.6 / 9आता लवकरच ती सुमितबरोबर लग्न करणार आहे. तसेच तिने तिच्या लग्नाची तयारीही सुरू केली आहे. 7 / 9बॉयफ्रेंडसह फोटो शेअर केल्यानंतर वनिता लग्न कधी करणार? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीनुसार, वनिता फेब्रुवारी २०२३मध्ये लग्न करणार आहे. तिने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. 8 / 9ग्न कुठे होणार आहे, लग्नाला कोण कोण उपस्थित असणार याबाबत अद्याप काहीही समजलेले नाही.9 / 9वनिता खरातचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. त्यांच्यासह अनेक फोटोही त्याने शेअर केले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications