By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 10:59 IST
1 / 10'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. पृथ्वीक प्रताप हा विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतो.2 / 10नुकतेच पृथ्वीकने गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकूळशी (२५ ऑक्टोबरला) लग्नगाठ बांधली.3 / 10अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पृथ्वीक व प्राजक्ता यांनी अत्यंत साधेपणाने विवाह केला. 4 / 10आता पृथ्वीकने लग्नातील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.5 / 10पृथ्वीकने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, 'झाड मातीच्या सलोख्या इतकं, घट्ट नातं जुळावं, बहरावी प्राजक्ता हर जन्मी अन् वसुंधरेस मी मिळावं!'.6 / 10या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री अप्रतिम असून चेहऱ्यावरील आनंद लपत नाहीये. दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद सर्वकाही सांगून जातोय. 7 / 10पृथ्वीक प्रतापने अगदी साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय का घेतला, यामागे खास कारण आहे. पृथ्वीकने दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. लग्नाचा खर्च वाचवून हे जोडपं दोन मुलांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणार आहेत. 8 / 10पृथ्वीत आणि प्राजक्ता वायकूळ हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. 9 / 10पृथ्वीक याने कधीच स्वतःच्या खासगी आयुष्याचा खुलासा केला नव्हता. गेल्या शुक्रवारी त्याने थेट लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. 10 / 10पृथ्विकने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. 'जागो मोहन प्यारे', 'अस्सं माहेर नको गं बाई' या मालिकांमध्ये तो झळकला आहे. 'क्लास ऑफ ८३' या हिंदी सिनेमातही त्याने काम केलं आहे. 'डिलिव्हरी बॉय' या मराठी सिनेमातही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.